हसन मुश्रीफांच्या मुलांवर तूर्तास कारवाई नाही; ईडीकडून कोर्टात देण्यात आली माहिती

हसन मुश्रीफांच्या मुलांवर तूर्तास कारवाई नाही; ईडीकडून कोर्टात देण्यात आली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या नाविद, साजिद आणि आबिद या तिन्ही मुलांवर मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. याच अर्जावरील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या तिघांवर देखील तूर्तास कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती ईडीकडून कोर्टात देण्यात आली आहे.

ईडीने हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ३५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुश्रीफांच्या तिन्ही मुलांची नावे समोर आली. ज्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मुश्रीफ यांच्या मुलांच्या बाजूने ज्येष्ठ वकील आबाद पौंडा, अमित देसाई आणि प्रशांत पाटील यांनी कोर्टात बाजू मांडली. परंतु, त्यांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीकडून विरोध देखील करण्यात आला.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी चौकशीमध्ये सहकार्य केले नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणातील चौकशीसाठी समन्स बजावून देखील ते हजार झाले नाही, अशी माहिती ईडीने दिली. तसेच जर या तिघांना डेकधील जामीन दिला तर या प्रकरणातील चौकशीवर त्याचा परिणाम होईल, असा दावा ईडीकडून करण्यात आलेला आहे.

हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यातील लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणत फसवनौक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर मुरगूड पोलीस ठाण्यात विवेक कुलकर्णी नामक व्यक्तीने मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुश्रीफ यांनी लोकांची ४० कोटींची फसवणूक केल्याचे या फिर्यादीने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

हेही वाचा – संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर, नितीन सरदेसाईंचा सरकारला इशारा

दरम्यान, हा गुन्हा दाखल होताच हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीच्या प्रकरणात गोवण्यासाठी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. तर विवेक कुलकर्णी याने आपल्या विरोधात दाखल केलेला गुन्हा हे एक षड्यंत्र असल्याचे दाखल हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या याचिकेत म्हंटले आहे. तर दुसरीकडे मुश्रिफांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या विवेक कुलकर्णी आणि इतर १६ जणांविरोधात मुरगूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

First Published on: March 6, 2023 4:29 PM
Exit mobile version