Ambadas Danve : ये साजिशों का दौर है और…; ठाकरे गटाच्या पहिल्या यादीनंतर अंबादास दानवे नाराज?

Ambadas Danve : ये साजिशों का दौर है और…; ठाकरे गटाच्या पहिल्या यादीनंतर अंबादास दानवे नाराज?

शिंदेंकडे जाशील तर आपला संबंध संपला, दानवेंच्या आईची सक्त ताकीद

मुंबई : महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीनंतर ठाकरे गटातील इच्छुक उमेदवार नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेच्या तिकीटाच्या प्रतीक्षेत असणारे अंबादास दानवे यांना डावलत ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर अंबादास दानवे यांनी ते नाराज नसल्याचे सांगितले. मात्र अंबादास दानवे यांच्या व्हॉट्सअप स्टेट्सवरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (This is an era of conspiracies and Ambadas Danve angry after Thackerays first memory)

हेही वाचा – Sadanand Date : सदानंद दाते NIA चे महासंचालक; केंद्राचा महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर विश्वास

छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे इच्छुक होते. यापूर्वी देखील त्यांनी तसे बोलवून दाखवले होते. तर, महाविकास आघाडीत संभाजीनगर मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे देखील जवळपास निश्चित झाले होते. परंतु, या लोकसभेतून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी याआधीच सुरू केली होती. मात्र, यंदा कोणत्या तरी नवीन चेहऱ्याला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी किंवा मला उमेदवारी द्यावी, असे अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. परंतु, पक्षाकडून तसे होत नसल्याने अंबादास दानवे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.

अंबादास दानवे यांची नाराजी लक्षात घेता त्यांना थेट मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. यावेळी त्यांना तुमची प्रचारासाठी राज्यात गरज असल्याचे सांगण्यात आले. तसेच संजय राऊत यांनीही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज ठाकरे गटाने ”माझ्या नशिबात लोकसभा आहे, मला ज्योतिषांनी तसं सांगितलंय” असं सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – MVA: मविआत नाराजी; ठाकरे गटाची यादी जाहीर होताच काँग्रेस नेत्यांची ‘दिल्लीवारी’

अंबादास दानवेंच्या व्हॉट्सअप स्टेट्सवर काय?

ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना विश्वास व्यक्त केला होता की, मी पक्षावर नाराज नाही, कारण पक्षाच्या मनात माझ्याविषयी दुसरा प्लॅन आहे. पक्षाने पदाधिकारी आणि जनता यांची मतं जाणून घेऊन उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत. जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये पोहोचतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी 2014 पासून उमेदवारीसाठी इच्छूक होतो. परंतु मी आज नराज नाही. संभाजीनगरसहीत सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे. मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन करुन सोबत असल्याचं आश्वस्त केल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याचं व्हॉट्सअप स्टेट्स काही वेगळंच सांगत आहे. “ये साजिशों का दौर है और हम कोशिशों मे उलझे हुए है”, असा व्हॉट्सअप स्टेट्स अंबादास दानवे यांनी ठेवला आहे. त्यांना स्टेट्सच्या माध्यमातून नेमकं काय सांगायचं आहे? हे स्पष्ट होऊ शकले नाही.

First Published on: March 27, 2024 3:06 PM
Exit mobile version