घरदेश-विदेशSadanand Date : सदानंद दाते NIA चे महासंचालक; केंद्राचा महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर विश्वास

Sadanand Date : सदानंद दाते NIA चे महासंचालक; केंद्राचा महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर विश्वास

Subscribe

देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अर्थात NIAच्या महासंचालकपदी आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून दाते यांची ओळख आहे.

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अर्थात NIAच्या महासंचालकपदी आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून दाते यांची ओळख आहे. त्याचमुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर विश्वास दाखवत त्यांच्यावर राष्ट्र सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाची असलेली जबाबदारी सोपवली आहे. आज (ता. 27 मार्च) अधिकारी सदानंद दाते यांची एनआयएच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (IPS Officer Sadanand Date Director General of NIA; Central Government trust in Maharashtra officer)

हेही वाचा… मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांकडून एकला चलो रे चा नारा; उमेदवारांची यादी जाहीर

- Advertisement -

देशात लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु, एटीएस किंवा एनआयएच्या बदल्या किंवा नियुक्त्यांमध्ये निवडणूक आचारसंहितेचा कोणताही अडसर येत नाही. त्यामुळे एनआयएच्या महासंचालकाची आणि अन्य दोन नेमणुका या निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे सध्याचे महासंचालक दिनकर गुप्ता हे या महिनाअखेर निवृत्त होत आहेत. त्यानंतर दाते त्यांच्या जागी रुजू होतील. त्यांच्या पदाचा कालावधी 31 डिसेंबर 2026 पर्यंत आहे. सदानंद दाते 1 एप्रिलपासून महासंचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर सदानंद दाते यांच्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

1990 च्या आयपीएस बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेले सदानंद दाते हे सध्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख तथा डीजीपी आहेत. नवनिर्मित मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणूनही दाते यांनी काम पाहिलेले आहे. 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. कामा आल्बेस रुग्णालयातील महिला व मुले रुग्णांना पाकिस्तानी अतिरेक्यांनी ओलिस धरले होते. त्यावेळी त्यांची सुखरूप सुटका दातेंनी केली होती. त्याबद्दल राष्ट्रतींकडून शौर्यपदक देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून अधिकारी सदानंद दाते यांची ओळख आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -