घरमहाराष्ट्रMVA: मविआत नाराजी; ठाकरे गटाची यादी जाहीर होताच काँग्रेस नेत्यांची 'दिल्लीवारी'

MVA: मविआत नाराजी; ठाकरे गटाची यादी जाहीर होताच काँग्रेस नेत्यांची ‘दिल्लीवारी’

Subscribe

नवी दिल्ली: महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 17 जणांना उमेदवारी दिली आहे. या यादीमध्ये काँग्रेस पक्ष ज्या जागांवर आग्रही होता त्या जागांवरही ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने दावा केलेल्या सांगली मतदारसंघात ठाकरे गटात चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. तसंच, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून काँग्रेसला वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्यायची होती. मात्र तिथेही ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस नाराज आहे. विश्वजीत कदमांसह विशाल पाटील यांनी थेट दिल्ली गाठली आहे. ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. (MVA Anger As soon as the Uddhav Thackeray group s list is announced Congress leaders Vishwajeet Kadam Vishal Patil in Delhi to meet Sonia Gandhi)

ठाकरेंकडून परस्पर उमेदवारी जाहीर

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सध्या मविआत नाराजीचा सूर आहे. कारण उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटली यांची उमेदवारी जाहीर केली आहे, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. सांगलीची जागा काँग्रेसला लढवायची आहे. याच मुद्यावरून आज काँग्रेसचे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे.

- Advertisement -

विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून ते तयारी करत आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूकदेखील त्यांनी लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. मागील काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.

(हेही वाचा: MNS : मनसे महायुतीत सहभागी होणार? उद्या चित्र स्पष्ट होणार, बाळा नांदगावकरांची महत्त्वाची माहिती)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -