जे तोडायचं काम करतात ते जास्त दिवस टिकत नाहीत; नाना पटोलेंचा विरोधकांना टोला

जे तोडायचं काम करतात ते जास्त दिवस टिकत नाहीत;  नाना पटोलेंचा विरोधकांना टोला

राहुल गांधी यांची भारत जोडो (bharat jodo yatra) यात्रा सध्या महाराष्ट्रातील शेगाव (shegaon) मध्ये आहे. या पदयात्रेला जनतेचा प्रतिसाद मिळत असला तरी राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात जे वक्तव्य केले त्यावरून राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप (bjp) कडून आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांची यांची शेगावात सभा होत आहे याच सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील जनतेशी संवाद साधला.

शेगावच्या सभेत नाना पटोले म्हणाले, ‘जे तोडायचे काम करतात ते जास्त दिवस टिकत नाहीत आणि जे जोडण्याचे काम करतात त्यांचा कधी अंत होत नाही आणि हाच संदेश भारत जोडो यात्रेमधून सर्वाना मिळतो आणि हेच काम राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून करत आहेत’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी विरोधकांना टोला लगावला.

कन्याकुमारी (kanyakumari) येथून राहुल गांधी (rahul gandhi) यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली. सध्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमणावर जाणतेचा पाठिंबा मिळत आहे. 2024 च्या निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन देशभरातच पक्षबांधणी करण्याच्या उद्देशाने भारत जोडो यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रात ही यात्रा दाखल झाल्यापासूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत सातत्याने आहेत. त्याच सोबत महाविकास आघाडीमधील अनेक नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

राहुल गांधी सुद्धा भरात जोडो यात्रेच्या माध्यमातून देशातील विविध भागात जाऊन तिथल्या जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. या पदयात्रे दरम्यान राहुल गांधी यांना जे अनुभव येत आहेत ते माध्यमांसमोर मांडत आहेत. कन्याकुमारी पासून सुरू झालेली ही पदयात्रा काश्मीर पर्यंत जाणार आहे.


हे ही वाचा – सावरकरांविरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचे तुषार गांधींकडून समर्थन, म्हणाले…

First Published on: November 18, 2022 6:37 PM
Exit mobile version