राज्यात अवकाळी पावसाचं सावट; ‘या’ दिवसांत पाऊस पडणार

राज्यात अवकाळी पावसाचं सावट; ‘या’ दिवसांत पाऊस पडणार

राज्यातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 24 तास पावसाचे.

सध्या राज्यात काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांच्या बद्दलची चिंता काहीशी मिटली आहे. पण आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं सावट येण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्यामुळे हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान राज्यात हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शिवाय अवकाळी पावसासह गारपीट देखील होवू शकते. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चितेंत आणखीन भर पडणार आहे.

याआधी देशातील काही राज्यांमध्ये १६ ते २० जानेवारीदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच या पावसाला अवकाळी पाऊस संबोधण्यात आले आहे. हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये बसणार आहे. पण हा अवकाळी पाऊस मान्सूनपूर्व पर्जन्य नसेल, अशी सविस्तर माहिती हवमानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था असलेल्या स्कायमेट वेदरचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश पालावल यांनी दिली होती.

पालावल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक चक्रीवादळी हवांचे क्षेत्र पूर्व मध्य प्रदेश आणि त्याच्या लगतच्या छत्तीसगड आणि विदर्भाच्या वर निर्माण होऊ शकते. याद्वारे तेलंगणामधून दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ तयार होऊ शकते. यामुळे देशातील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्प भूभागावर येऊन हवामान बिघडून पाऊस पडू शकतो.


हेही वाचा –  मुंबई-पुण्यात पुढील तीन दिवस पाऊस


 

First Published on: February 12, 2021 8:07 AM
Exit mobile version