पुण्यात गॅस गळतीमुळे स्फोट: सहा महिन्याच्या चिमुकलीसह तीन जण जखमी

पुण्यात गॅस गळतीमुळे स्फोट: सहा महिन्याच्या चिमुकलीसह तीन जण जखमी

पुण्यात गॅस गळतीमुळे स्फोट: सहा महिन्याच्या चिमुकलीसह तीन जण जखमी

पुण्यातील खराडी येथे गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आहे. यामध्ये सहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून आई वडील जखमी झाल्याचं समोर आलं आहे. मध्यरात्री घरातल्या गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शंकर भवाळे (वय २८), आशाताई शंकर भवाळे (वय २२) आणि स्वराली भवाळे(सहा महिने) अशी या कुटुंबियातील सदस्यांची नावं आहेत. या गॅस स्फोटामुळे आसपासच्या घरांचे नुकसान देखील झालं आहे. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.

नक्की काय घडलं?

रविवारी रात्री हे कुटुंब झोपल्यानंतर गॅस गळती होऊन संपूर्ण घरात गॅस पसरला होता. सकाळी उठल्यानंतर आशाताई पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटवला आणि खूप मोठा स्फोट होऊन आग लागली. या स्फोटामुळे बाजूच्या चार घरावरील पत्रे उडू गेले. या स्फोटाच्या आवाजामुळे शेजारच्या नागरिकांनी भवाळे कुटुंबियांच्या घराकडे धाव घेतली. स्फोटामुळे सहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून तिचे आई-वडील जखमी झाले आहे. स्फोटाच्या आगीमुळे सर्व साहित्य आणि कपडे जळाले आहेत.


हेही वाचा – बिहारमध्ये आढळली करोना व्हायरसची संशय़ित तरुणी


 

First Published on: January 27, 2020 11:42 AM
Exit mobile version