खेड येथील गोवंश हत्याप्रकरणी तीन जणांना अटक

खेड येथील गोवंश हत्याप्रकरणी तीन जणांना अटक

गोवंश हत्या प्रकरण

खेड येथील धामणदेवी या ठिकाणी गोहत्या होत असल्याचे काही ग्रामस्थांना २५ जानेवारी रोजी आढळून आले होते. त्यांच्या निदर्शनास ५ इसम स्कॉर्पिओ गाडीसह संशयास्पदरीत्या फिरताना ग्रामस्थांनी पाहिले होते. ग्रामस्थांना हत्यारांचा धाक दाखवून हे ५ इसम पळून गेले होते. या गुन्ह्याच्या तापासामध्ये शमशुद्दीन इस्माईल खेरटकर (वय ३३, रा. खेर्डी मोहल्ला चिपळूण), पांडुरंग जयराम कदम (वय ५०, रा. आवाशी देऊळ वाडी खेड), संतोष लक्ष्मण गमरे (वय ४८, रा. आवाशी बौद्धवाडी खेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

जनावरांची हत्या करण्यासाठी गुरांचा वापर

संशयीत आरोपी गावोगावी फिरून गुरे जमा करतात. नंतर ती गोठ्यात एकत्र ठेवतात, असे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी आढळेल्या बैलाची ओळख पटली असून तो वनिता शाहू आंब्रे (रा. खालचीवाडी खेड) यांच्या मालकीचा आहे. जनावरांची हत्या करण्यासाठीच या गुरांचा वापर होत होता. हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जनावरांची हत्या करून त्यांचे मांस नेणारी टोळी, स्कॉर्पिओ गाडी आणि त्यातील संशयीत यांच्याबाबत पोलिसांना माहिती उपलब्ध झाली असून हे आरोपी देखील लवकरच ताब्यात येतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

First Published on: February 2, 2019 2:35 PM
Exit mobile version