नातवाच्या अकाली मृत्यूच्या धक्क्याने आजोबांचा मृत्यू

नातवाच्या अकाली मृत्यूच्या धक्क्याने आजोबांचा मृत्यू

जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली होडी पाण्यात बुडाल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यात गणेश भाऊ साबळे, स्वप्निल बाळू साबळे आणि पंढरीनाथ मारुती मुंढे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नातू स्वप्निल साबळेच्या अकाली मृत्यूच्या धक्क्याने आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मारुती सोमा साबळे असे मृत्यू झालेल्या आजोबांचे नाव आहे.

माणिकडोह धरण – मारुती सोमा साबळे

निमगिरी आणि राजूर परिसरातील आठ जण शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारा मासेमारी करण्यासाठी माणिकडोह धरणाच्या क्षेत्रात होडी घेऊन निघाले होते. होडी पाण्यात गेल्यानंतर सर्वांचा भार न पेलवल्याने होडी बुडाली, यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण वाचल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या तिघांचा शोध घेण्यात आला होता. मात्र, त्यांना अपयश आल्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून या पथकाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्या युवकांमध्ये मारुती सोमा साबळे यांचा नातू स्वप्नील बाळू साबळे याचा देखील समावेश होता. आपल्या नातवाचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघ्या ४८ तासात आजोबांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: May 27, 2019 2:58 PM
Exit mobile version