जयंत पाटील एकाच झटक्यात भाजपला दोन धक्के देणार!

जयंत पाटील एकाच झटक्यात भाजपला दोन धक्के देणार!

जयंत पाटील एकाच झटक्यात भाजपला दोन धक्के देणार!

सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात शिवसेना विरुद्ध नारायण राणे या वादाची चर्चा रंगली आहे. पण यादरम्यान भाजपाला झटका मिळणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील एकाच वेळी भाजपला मोठा धक्का देणार आहे. भाजपचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचे सुपुत्र वैभव शिंदे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. आज, शुक्रवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैभव शिंदे राष्ट्रवादीचं घड्याळ घालणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे वैभव शिंदे यांच्यासोबत तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश करणार आहेत.

वैभव शिंदे जरी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असतील तरी देखील शिंदे गटाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे, अस मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विलासराव शिंदे विद्यालयात वाळवा तालुक्यामधील नगसेवक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी महिलांचा मेळावा झाला. यावेळी सर्वांनी वैभव शिंदे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास संमती दिली. तसेच यावेळी अनेकांनी आपली मत व्यक्त केली.

प्रवेशाबाबत वैभव शिंदे म्हणाले की, ‘कार्यकर्त्यांना विचारात घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे आताही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले आहे. विकासात्मक वाटचालीकरिता एकत्र येत आहोत.’ दरम्यान भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी येणारी निवडणूक सोबत लढू. पण महाविकासआघाडीमधील काँग्रेसला विरोध असेल, अशी स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांच्या समोर मागील आठवड्यात स्पष्ट मांडली होती. त्यामुळे जत तालुक्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विलासराव जगताप पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील एकाच झटक्यात भाजपला दोन धक्के देण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – OBC आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक


 

First Published on: August 27, 2021 7:56 AM
Exit mobile version