किनाऱ्यावर पर्यटकांची पोलिसांना मारहाण

किनाऱ्यावर पर्यटकांची पोलिसांना मारहाण

पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर

प्री वेडिंगच्या शूटिंगसाठी अलिबागच्या श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांनी चक्क पोलीसांवर हल्ला केला आहे. पर्यटकांनी पोलीस निरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे पोलीस सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे. हे पर्यटक पुणे, संभाजीनगर येथून प्री वेडींगच्या शूटींगसाठी आले होते. यावेळी ते शूटींगसाठी ड्रोनचा वापर करत होते. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास किनाऱ्यावरील सुरक्षेच्या पाहणीसाठी पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर आले. यावेळी त्यांना ड्रोन कॅमेरा दिसला. त्यामुळे किनाऱ्यावर ड्रोनने शूटींग करण्याची परवानगी तुम्ही घेतली आहे का, असा प्रश्न खेडेकर यांनी पर्यटकांना विचारला. या पर्टकांचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे. खेडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांचा त्यांना राग आला आणि ते त्यांच्यावर धावून गेले. यामध्ये खेडेकर यांच्या डाव्या हाताल गंभीर इजा झाली आहे. त्याचबरोबपर पर्यटकांनी खेडेकर यांच्यासोबत असलेल्या पोलीस सहकाऱ्यांवरही हल्ला केला.

हेही वाचा – बाण मारलेला अमेरिकन पर्यटक एकटा नव्हता – पोलीस

११ पर्यटकांना अटक

पोलीस निरीक्षकाला मारहाण करण्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी ११ पर्यटकांना अटक केली आहे. तर २ पर्यटक पळून गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मात्र अटक केलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी काही राजकीय नेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. यासाठी काही व्हीआयपींचे फोन अधिकाऱ्यांना आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी अतुल सुराणा, सत्यम सुराणा, शुभम सुराणा, वर्षा सुराणा, अंतुल गोलेचा, विष्णू गव्हाणे, नागेश पोतदार, मयूर पोतदार, हर्षल मसजी, प्रचीती सखलेचा, संगीत सखलेचा या पर्यटकांना पोलिसांनी अटक केली आहे.


हेही वाचा – पर्यटकाच्या मृत्यूनंतर महाबळेश्वरमध्ये घोडेस्वारी बंद; लाखोंचे नुकसान

First Published on: December 6, 2018 11:51 AM
Exit mobile version