देवबांध मोखाडा येथे आदिवासींची अनोखी भाऊबीज

देवबांध मोखाडा येथे आदिवासींची अनोखी भाऊबीज

देवबांध मोखाडा येथे आदिवासींची अनोखी भाऊबीज

कोकण कट्टाने आदिवासी भगिनींसाठी एका अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली आहे. या उपक्रमातून यंदा देवबांध, मोखाडा येथे सह्याद्री आदिवासी बहुविध संस्था यांच्या सहकार्याने विविध आदिवासी पाड्यातील भगिनींना साड्या आणि दिवाळी फराळ, अन्नधान्य तसेच लहानमोठ्यांना कपडे अशी भाऊबीज भेट देण्यात आली. यामध्ये संस्थेच्या सर्व सदस्यांची आरती करुन भाऊबीज करून औक्षण करण्यात आले. या आनंदात स्थानिक आदिवासी पाड्यातील शेकडो भगिनी उपस्थित होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण कट्टा संस्थेने ‘एक साडी, नवी साडी आदिवासी भगिनींसाठी’ असे आव्हान केले होते. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला होता. मोखाडा देवबांध येथे जाऊन हा भाऊबीज कार्यक्रम सह्याद्री संस्थेच्या गणेश मंदिराच्या आवारात संपन्न झाला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कोकणकट्टाचे संस्थापक अजित पितळे, सुजित कदम, दया मांडवकर, दादा गावडे, आत्माराम डिके, सुनील वनकुंद्रे, रोहित कारेकर, संतोष कदम आदींनी मेहनत घेतली.

First Published on: November 21, 2020 9:34 PM
Exit mobile version