ठामपाच्या सुरक्षा विभागामार्फत रक्तदानाद्वारे 26/11मधील शहिदांना वाहिली आदरांजली

ठामपाच्या सुरक्षा विभागामार्फत रक्तदानाद्वारे 26/11मधील शहिदांना वाहिली आदरांजली

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सुरक्षा विभागातर्फे संविधान दिनानिमित्त 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करुन आदरांजली अर्पण केली. यावेळी ठाणे महापालिकेच्या सुरक्षा विभागातील 161  कर्मचाऱ्यांनी रक्तदान करुन एकूण 161 बाटल्या रक्त संकलित केले. या उपक्रमाबददल सुरक्षा विभागाचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कौतुक केले.

महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  परिवहन सभापती विलास जोशी, आयुक्त 1 संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, सुरक्षा विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आदी उपस्थित होते.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पुर्ण झाली, या हल्ल्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीसांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या हल्ल्यातील शहीदांनी देशासाठी आपले बलिदान दिले, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ठाणे महापालिकेतील सुरक्षा विभागाच्या अधिकारी कर्मचारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळजवळ 161 जणांनी रक्तदान करुन 161 बॉटलस रक्त संकलित केले. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

 कोणी 101 तर कोणी 50 व्या वेळी केले रक्तदान

या रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या मोनाली बांगर, प्रकाश भोसले, 50 वेळा रक्तदान करणारे पर्यवेक्षक रणजीत पाटील, 101 वेळा रक्तदान करणारे सुनील होरंबे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात आयुक्त अभिजीत बांगर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.


हेही वाचा : भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार, उद्धव ठाकरेंची


 

First Published on: November 26, 2022 7:52 PM
Exit mobile version