त्र्यंबकेश्वर परिसर भक्तिरसात दंग; पाचशेहून अधिक दिंड्यांसह लाखो भाविक शहरात दाखल

त्र्यंबकेश्वर परिसर भक्तिरसात दंग; पाचशेहून अधिक दिंड्यांसह लाखो भाविक शहरात दाखल

कोरोनाच्या दोन वर्षाच्या व्यत्ययानंतर यंदा सर्व सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. याचं पाश्वर्वभूमीवर आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव साजरा होत आहे. जवळपास दोन वर्षानंतर आज या भव्य यात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. या यात्रोत्सवासाठी भाविकांनी त्र्यंबकेश्वरमध्ये यायला सुरुवात केली आहे तसेच लाखो वारकरी सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थित देखील झाले आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये आज आनंदाच आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

आज संपूर्ण त्र्यंबक नगरी भक्तीरसात नाहून गेली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आज पहाटे निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा राज्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक केली. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमधील सूर्यवंशी दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला.

राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या दिंड्यांनी त्र्यंबकेश्वर परिसर दुमदुमलेला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी देखील भाविकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. भाविक कुशावर्तात स्नानासाठी देखील मोठी गर्दी करत आहेत.

स्वच्छतेचे योग्य नियोजन केल्यास दिंडीला मिळणार पुरस्कार
यंदा जवळपास पाचशेहून अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वर शहरात दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिंड्यांना आपण थांबत असलेल्या ठिकाणी योग्य स्वच्छतेचे नियोजन केल्यास त्या दिंडीला निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कारामध्ये दिंडीला उपयोगी साहित्य आणि स्मृतिचिन्ह प्रदान देखील प्रदान करण्यात येणार आहे.


हेही वाचा :

आज षट्तिला एकादशीला ‘या’ चुका टाळा; श्रीविष्णू होतील प्रसन्न

First Published on: January 18, 2023 9:44 AM
Exit mobile version