मेट्रोच्या खोदकामा दरम्यान पुण्यात सापडली दोन भुयारे

मेट्रोच्या खोदकामा दरम्यान पुण्यात सापडली दोन भुयारे

पुण्यात दोन भुयारे सापडली

पुण्यातल्या मेट्रो कामाला वेग आला आहे. स्वारगेट येथे सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोच्या कामासाठी खोदकाम सुरु असताना दोन भुयारं सापडली आहेत. भुयार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे मेट्रो कामाच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आहे. स्वारगेट चौकामध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. साधारण ५० वर्षांपूर्वी स्वारगेट इथे असलेल्या स्विमिंग टँकला भूयारी मार्गाने पाणी देण्यासाठी कॅनॉलमधून केलेली व्यवस्था असल्याचे सांगितले.

 

पुण्याच्या स्वारगेट परिसरात दोन भुयारी मार्ग सापडले आहेत. जमिनीखाली विटांचे पक्के बांधकाम बनवलेले हे भुयारी मार्ग आहे. पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असतानाच अचानक भुयारी मार्ग आढळून आले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये याठिकाणी दोन भुयारं आढळून आली. ही भूयारे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. भुयारं नेमकी कधी आणि कोणी बांधली याचा शोध सुरु आहे.

पुणे महानगरचे जल केंद्र ते स्वारगेटचा जलतरण तलाव या दरम्यान हे भूयार आहे. जलकेंद्रातून जलतरण तलावात पाणी आणण्यासाठी हे बांधकाम कले असावे असे सांगितले जाते. अंदाजे ५० पेक्षआ अधिक वर्षापूर्वी या भूयाराचे बांधकाम केले असावे असे सांगितले जात आहे. पुणे मेट्रोच्या खोदकामावेळी जमीनीचा काही भाग खचला. त्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता भूयारे असल्याचे समोर आले.

First Published on: March 29, 2019 2:40 PM
Exit mobile version