सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केली. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठकारेंनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

येत्या २२ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने सवलत द्यावी. सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे. जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकिटामागे २५ रुपये सेवा शुल्क आकारण्यास परवानगी द्यावी. विद्युत वापर नसल्याने देयके कमीतकमी वापरावर आधारित असू नये. मिळकत कर आकारू नये आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.

चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर

राज्यातील शहरांमध्ये बसेस व ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे त्यादृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील व मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात देखील नियोजन करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील निर्बंध शिथल

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे महाविकास आघाडी कोरोना निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात येत आहे. २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यात येत आहेत. तसेच हॉटेलच्या वेळेत वाढ करण्यात येत आहे.


हेही वाचा : Mumbai Unlock : हॉटेल, दुकाने रात्री १२ पर्यंत खुली राहणार


 

First Published on: October 18, 2021 7:16 PM
Exit mobile version