“न्यायालयाच्या निकालाने सत्तेसाठी हपापलेल्यांचे…”, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

“न्यायालयाच्या निकालाने सत्तेसाठी हपापलेल्यांचे…”, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्षावरील प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी करत हे प्रकरणा सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. गद्दार खोके आणि बऱ्याच शब्दांचा प्रयोग याआधी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारसाठी केलेला आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे सत्तेसाठी हापापलेल्यांचे राजकारणाची चिरफाड झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. (Uddhav thackeray criticizes Maharashtra government)

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल: नबाम रेबिया प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग

प्रसार माध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, एका गोष्टीचे समाधान आहे. मी वारंवार असं म्हंटल होत की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसेल तर तो आपल्या देशातील लोकशाही जीवंत राहणार की नाही, याबद्दलचा असेल. हा निकालाने एकूनच सत्तेसाठी हापापलेल्यांचे राजकारणाची चिरफाड केलेली आहे. या प्रकरणात राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद नाही तर अयोग्य होती. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेचे सुद्धा वस्त्रहरण झालेले आहे. राज्यपाल ही यंत्रणा आत्तापर्यंतची आदरयुक्त अशी यंत्रणा होती. पण राज्यपाल यंत्रणेचे धिंदवडे ज्याप्रमाणे शासनकर्ते काढत आहेत. ते पाहिल्यानंतर राज्यपाल यंत्रणा ही अस्तित्वात ठेवावी की नाही, हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयापुढे न्यायला पाहिजे, असे यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

तूर्तास सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे. त्याप्रमाणे अध्यक्षांना अधिवेशन बोलावण्याचा हक्क नव्हता. पण अपात्रतेचा निर्णय हा त्यांनी अध्यक्षांवर जरी सोपावला असला तरी पक्षादेश हा त्यावेळची शिवसेना म्हणजेच माझी शिवसेना त्या शिवसेनेचाच राहील. त्यामुळे अध्यक्षांनी या प्रकरणात वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी आम्ही मागणी तर करूच, असे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेनेतून फुटलेले 16 आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश आज गुरुवारी (ता. 11 मे) सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या 16 आमदारांमध्ये पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. हा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळेचे बंधन दिलेले नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे केव्हा याबाबतचा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. आर. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निकाल गुरुवारी दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकाल वाचन केले. सुमारे ३५ मिनिटे न्यायालयाने निकाल वाचन केले. यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला.

First Published on: May 11, 2023 2:14 PM
Exit mobile version