…तेव्हा बाळासाहेबांनी आजच्या पंतप्रधानांना वाचवलं, उद्धव ठाकरेंनी केली त्या काळातील घटनेची आठवण

…तेव्हा बाळासाहेबांनी आजच्या पंतप्रधानांना वाचवलं, उद्धव ठाकरेंनी केली त्या काळातील घटनेची आठवण

२५-३० वर्ष एक राजकीय मैत्री आम्ही जोपासली. काय मिळाल आम्हाला. हिंदुत्व हे आमच्यातले आपलेपणा. त्यांना कोणाचीच गरज नव्हती. अकाली, शिवसेना नको होती त्यांना. अस्पृश्य अशी तेव्हा वाईट दिवसात युती. तेव्हा बाळासाहेबांनी आजच्या पंतप्रधानांना वाचवले. अटलजी राजधर्माचे पालन करणार होते. तेव्हा काळाची गरज म्हणून बाळासाहेबांनी शब्द टाकला. तसे झाले नसते तर आज ते इथवर आले असते का? बाळासाहेबांनी कधीही द्वेषभावना ठेवली नाही, असं म्हणत शिवसेनेचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या काळातील घटनेची आठवण करून दिली.

बाळासाहेबांनी आजच्या पंतप्रधानांना वाचवलं

आज गोरेगाव येथे आयोजित उत्तर भारतीय मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आम्ही हिंदू म्हणजे केवळ मराठी आहोत असे नाही आणि हिंदी भाषिकांचा द्वेष करा अशी आमची कधीच भावना आणि कृती नव्हती. हिंदू म्हणजे आपण सगळे एकच. देश विरोधात कुठलाही धर्मीय असो तो आमचा शत्रूच ही बाळासाहेबांची आम्हाला शिकवण. आम्ही भाजपची साथ सोडली हिंदुत्व नव्हे. आम्ही काल, आज आणि उद्यापण हिंदूच. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. त्यांचे हवे तसे हिंदुत्व मी मानत नाही. केवळ द्वेष करायचा हे आमचे हिंदुत्व. आज चांगला मुहूर्त. उत्तर भारतीयांच्या समवेत आम्ही आज आलो आणि आज कुरिअरने पार्सल परत जातय. ताकाला जाऊन भांडे आम्ही लपवत नाही. आमच्यातले काही गळ्यात पट्टा घालून त्यांच्या मागे गेले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गर्व से कहो हम हिंदू…

मला बाळासाहेबांनी कुणाची गुलामी करायला नाही शिकवले. मोदीजी परवा आपल्या पोळ्या भाजून गेले. हेच मी केले असते तर? मी बोहरा समाजाच्या विरोधात नाही. त्यांनी केले तर सगळ माफ आम्ही केले तर गुन्हा. तो चष्मा आता बदलायला हवा. सगळ्यांसाठी आमच्या मनात चांगल्याच भावना. सगळ्यांना सोबत घेऊन जायचे आहे. दोन वेळा शिवसैनिक रस्त्यावर उतरला १९९२-९३ आणि मी मुख्यमंत्री असतांना कोरोना काळात. मी कधीच मराठी अमराठी, हिंदू मुस्लमान असा भेदभाव केला नाही. आपण पाच वर्ष एकत्र असतो, शाखेत येतात पण निवडणुकीत का वेगळे होतो? ही भाजपची इंग्रज नीती. ह्यांना फक्त सत्तेच्या घोड्यावर बसायचे इतरांनी भांडायचे. मी डोळे उघडायला आलोय द्वेष वाढवायला आलोय. असाच कारभार सुरु राहिला तर हिंदुत्व धोक्यात. गर्व से कहो हम हिंदू ही घोषणा माझ्या वडिलांनी दिली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदुत्वातून उत्तर भारतीय वगळता येणार नाही

२०१८ साली मी रामलल्लाच्या दर्शनाला गेलो, शिवजन्मभूमीची माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो. शरयू मातेची आरती केली. कुणी मान्य करो अथवा नाही पण त्यानंतर राम मंदिरावर न्यायालयाचा निकाल आला. मी मुख्यमंत्री पण झालो. भाषा कुठलीही असो मनं मिळायला हवीत. जो संवाद होतो तो ह्दयातून असायला हवा. मन मिळाली की मार्ग स्पष्ट होतो. मी आता हिंदीतून बोलातोय, पण मला खात्री आहे माझ्या हिंदी पेक्षा तुमची मराठी अधिक उत्तम असेल. पिढ्या न पिढ्या तुम्ही इथे आहात. हा मेळावा नव्हे बैठक. मेळाव्यासाठी मैदान अपुरे पडेल. परिचयाची आपल्याला गरज नाही. हिंदुत्वातून उत्तर भारतीय वगळता येणार नाही. आता वेळ आलीय की भारतीयांना हिंदुत्व म्हणजे काय? याचे उत्तर हवे आहे. केवळ एकमेकांचा द्वेष हे हिंदुत्व नाही. मी नेहमीच तुमच्या सोबत असावे अशी इच्छा ठेवली. त्यात काहीच चूक नाही.

मराठीत आपण राम राम म्हणतो तुम्ही जय श्रीराम म्हणता बिहारी बांधव जय सियाराम म्हणतात. म्हणजे आपल्यात राम आहेच. राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व. ह्दयात राम आणि हाताला काम हेच आपले ध्येय. अनेक वर्षांनी बाळासाहेबांच्या वेळची सर्व लोक आज पुन्हा भेटतायत. एक चांगली एकजूट होतेय. सर्वसामान्यांच्या स्वप्नातला एक राष्ट्र निर्माण करायचे आहे. परवा जैन बांधवांच्या कार्यक्रमात गेलेलो ते म्हणाले उध्दवजी आप खून माँगोगे तो खून भी देंगे, मी म्हणालो खून नही सिर्फ वोट दिजीए. आता स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी एकत्र यायलाच हवे. अजून काही लोकांशी संवाद साधायचा आहे. मग जाहीर सभा घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

घ्या निवडणुका मी पुन्हा त्यांना आव्हान देतो…

आताही भाजपची निवडणुक घेण्याची हिंमत होत नाहीए. हिंमत नाही आणि हिंदूंचे नेतृत्व करतायत अस यांचे म्हणणे. हिंदू असा लेचापेचा नाही घ्या निवडणुका मी आज पुन्हा त्यांना आव्हान देतो. आपण भेदभावाच्या भिंती उभारल्या तर आपले स्वातंत्र्य धोक्यात. आपले ऐक्य हीच आपली शक्ती. म्हणूनच आपल्याला एकत्रित राहावे लागेल. मधल्या काळात काही गैरसमज निर्माण झाला होता तो आज दूर करुन हातात हात घालून आपण पुढे जाऊ, असंही ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात


 

First Published on: February 12, 2023 9:30 PM
Exit mobile version