भाजपच्या प्रलोभनाला बळी पडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन

भाजपच्या प्रलोभनाला बळी पडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन

कुणाला घाबरायचे नाही, कुणाला जुमानायचे नाही’ अशी हिम्मत देत भाजपच्या दबावाला आणि प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि अपक्ष आमदारांना सोमवारी केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर वर्षा निवासस्थानाच्या दारातून सर्व आमदारांना पश्चिम उपनगरातील मढ आयलंडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. (uddhav thackeray said Do Not accept bjp offer for rajya sabha election)

१० जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीची शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्व शिवसेना आमदार आणि काही अपक्षांची उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. आपल्याला एका कट्टर शिवसैनिकाला निवडून आणायचे आहे. कोणाला घाबरायचे नाही की कुणाला जुमानायचे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून तर शिवसेना पक्ष म्हणून कायम तुमच्या पाठिशी आहे. तुमची मतदारसंघातील कोणतीच कामे अडणार नाहीत. कोणत्याही ऑफरला बळी पडू नका, कोणत्याही अफावांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

या बैठकीनंतर सर्व आमदारांची पाठवणी रिट्रीट हॉटेलवर करण्यात आली. १० जून रोजी मतदानापर्यंत या आमदारांना सुरक्षितस्थळी हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे. मते फुटू नयेत यासाठी शिवसेना मोठी खबरदारी घेत आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्पेक्स येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी महाविकास आघाडीच्या सर्व तसेच सहयोगी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आघाडी सरकार स्थापन होताना जशी आमदारांना शपथ दिली, तसा शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. यातून आघाडी आपले संख्याबळ दाखवणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी मल्लीकार्जून खर्गे मार्गदर्शन करणार आहेत.आमदार हॉटेलमध्ये रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर वर्षावरुन थेट आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. तसेच मते फुटू नये यासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत आमदार हॉटेलमध्ये राहणार आहेत. मुंबईतील रिट्रीट या हॉटेलमध्ये सेना आमदारांना ठेवण्यात येणार आहे. या आमदारांवर शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचा पहारा असणार आहे.


हेही वाचा : युवराजांच्या अयोध्या दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठवणे म्हणजे अवमूल्यन, प्रवीण दरेकरांची टीका

First Published on: June 6, 2022 10:42 PM
Exit mobile version