उद्धव ठाकरेंनी लढायला हवं होतं, पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली खंत

उद्धव ठाकरेंनी लढायला हवं होतं, पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली खंत

सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme court) निकाल संभ्रमात टाकणारा होता. या निकालातून काही स्पष्टता आलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्यांसदर्भात काही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अनिश्चितता आहे. ११ जुलैला याचिकेवर सुनावणी करू असं कोर्टाने सांगितलं. पण त्यांनी आपलाच निर्णय बदलला. सर्वोच्च न्यायालयाकडून अशी अपेक्षा नव्हती, अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केली. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. तसेच, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबूक लाईव्ह न करता विधीमंडळात येऊन भूमिका मांडायला हवी होती, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (Uddhav Thackeray should have fought, Prithviraj Chavan expressed grief)

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं सूचक ट्विट, म्हणाले… नशीब आणि कर्तृत्व

उद्धव ठाकरेंविषयी बोलताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडून राजीनामा द्यायला हवा होता. राज्यातील जनतेला त्यांची बाजू कळाली असती. विरोधी पक्षनेते तसंच आणखी काही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केलं हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आलं असतं. एक-दोन तास सभागृह चाललं असतं आणि नंतर निर्णय घेतला असता तर चाललं असतं,” असं स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं.

चव्हाण पुढे म्हणाले की, आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिली नाही. रक्तपात होईल अशी त्यांना भिती वाटली. पण ते खोटं होतं. त्यांनी लढायला हवं होतं.” ही माझी नाराजी नसून वैयक्तिक मत आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा मुंबईत गेल्यावर पुढची रणनीती सांगेन, एकनाथ शिंदेंची गुगली

“ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अडीच वर्ष पाठिंबा दिला त्यांना सांगायला हवं होतं. फेसबुक लाईव्ह आणि विधीमंडळात बोलणं यात फरक आहे. विधीमंडळात जे बोलतो ते रेकॉर्डवर राहतं,” असं यावेळी ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं

एकनाथ शिंदेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर राग काढला तोही काही खरा नव्हता. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. तसंच यावेळी घडेल अशी त्यांना अपेक्षा होती. पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. शरद पवारांनी दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते असल्याने कनिष्ठ व्यक्तीच्या हाताखाली काम करणं अवघड जाईल अशी भूमिका घेतली होती, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 

First Published on: June 30, 2022 2:57 PM
Exit mobile version