मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून मुलाने पळवून नेलं उसाच्या शेतात आणि…!

मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून मुलाने पळवून नेलं उसाच्या शेतात आणि…!

मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तीला अपहरण करून उसाच्या शेतात लपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्यादीवरून कुर्डूवाडी पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतलं आहे. एक आरोपी फरार आहे. ही घटना लव्हे या गावात घडली.

तानाजी शेंबडे यांचा मामा लव्हे येथे राहतात. तानाजीने मामाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाची अनेक वेळा मागणी घालूनही मामाने लग्नाला नकार दिला होता. मुलीचाही या लग्‍नास विरोध होता. याचवेळी मुलीच्या लग्नासाठी माढा तालुक्यातील एका गावामध्ये स्थळ पाहण्यासाठी पीडित मुलीचे वडील गेल्याची बातमी माळशिरस येथील भाच्याला समजली. यानंतर त्याने मुलीचे अपहरण करण्याचा प्लान आखला.

आणि अपहरण केलं

तानाजी शेंबडे व त्याचा भाऊ अभिजित कुर्डूवाडी येथे आले. मुलीचे अपहरण करण्यासाठी या दोघांनी माढा तालुक्यातील महादेववाडी येथील त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्‍वर गोफणे यास चारचाकी गाडी भाड्याने आणण्यास सांगितले. त्यानुसार ज्ञानेश्‍वर यांनी कव्हे येथील विकास चोपडे यांची चारचाकी गाडी आणली. यातून चौघे लव्हे येथील मामाच्या वस्तीवर गेले. घरी पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ दोघेच होते. तानाजीने आल्याबरोबर मामाच्या लहान मुलाला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर आणायला सांगितले. मुलगा आतल्या खोलीत चार्जर आणण्यासाठी गेला, तेव्हा बाहेरून कडी लावून दरवाजा बंद केला. त्यानंतर तानाजीने मुलीला ओढत आणून गाडीत बसवले.

यानंरत पोलिसात तक्रार दिली असता. आरोपीच्या नावानिशी पोलिसांत फिर्याद दाखल होताच पोलिसांचे एक पथक माळशिरस येथे गेले. परंतु याबाबत मुलाच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदाराच्या सूचनेनुसार बेंबळे येथे तानाजीच्या नातेवाईकाकडे गेले. तेथेही मुलीचा शोध लागला नाही. अपहरणकर्त्यांनी मुलीला ऊसाच्या फडात मध्यभागी नेऊन ठेवले होते.

पोलिसांनी दिलेल्या धमकीनंतर बेंबळे येथील नातेवाईकांनी तानाजीला त्या पळवून आणलेल्या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार तानाजी पहाटेच त्या मुलीला घेऊन माळशिरस या आपल्या गावी गेला. माळशिरस येथून याबाबतची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी पीडित मुलीसह अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना मदत करणारा गाडीचालक विकास चोपडे अद्याप फरार आहे.

कुर्डूवाडी पोलिसांत तानाजी मधुकर शेंबडे, अभिजित मधुकर शेंबडे दोघे बंधू व त्यांना मदत करणारे त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्‍वर पांडुरंग गोफणे , विकास चोपडे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


हे ही वाचा – अलर्ट! SBI ग्राहकांनो ताबडतोब मोबाईलमधून ‘हे’ अॅप काढून टाका!


 

First Published on: June 10, 2020 4:47 PM
Exit mobile version