देशात कोरोना लसींचा तुटवडा नाही, राज्यांना कोरोना लसी पुरवल्या जातील – केंद्रीय आरोग्यमंत्री

देशात कोरोना लसींचा तुटवडा नाही, राज्यांना कोरोना लसी पुरवल्या जातील – केंद्रीय आरोग्यमंत्री

कोविन पोर्टलमध्ये पुढील आठवड्यापासून हिंदीसह १८ भाषांचा समावेश, कोविड परीक्षण लॅब जोडणार

देशात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशात लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. परंतु कोरोना लसीकरण करताना राज्यात आणि देशात लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. लसींचा तुटवडा झाल्याने देशात अनेक लसीकरण सेंटर बंद ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारने देशात तसेच इतर देशांना कोरोनाचा पुरवठा सुरु ठेवला होता त्यामुळे देशात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे विरोधकांनी म्हटले होते. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही आहे. देशात कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, गेल्या काहिदिवसांपूर्वी देशात कोरोना लसींचा तुटवडा असल्याच्या चर्चा होत होत्या परंतु देशात कोरोना लसींचा तुटवडा नाही सर्व राज्यांना कोरोना लसी पुरवल्या जातील, परंतु राज्यांनी कोरोना लसींची साठवणूक न करता सर्व लसीकरण केंद्रांना वेळेत लस पुरवल्या पाहिजेत. असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

देशात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी केंद्रावर आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली होती. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, मागील काहिदिवसांपूर्वीपासून देशात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे. परंतु देशात लसींचा तुटवडा नाही आहे. सर्व राज्यांना कोरोना लसी पुरवल्या जातील तसेच ज्या राज्यांना कोरोना लस दिल्या जात आहेत. त्यांनी वेळेत कोरोना लसीकरण केंद्रावर पाठवाण्याचे काम राज्यांनी करावे.

देशात आतापर्यंत ११ करोड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. देशातील महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ या प्रमुख आठ राज्यांना ६०.१६ टक्के लसींचा पुरवठा करण्यात आला असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.

First Published on: April 14, 2021 6:18 PM
Exit mobile version