Video: अमृता फडणवीस इज बॅक; आता लाँच केलं इंग्लिश गाणं!

Video: अमृता फडणवीस इज बॅक; आता लाँच केलं इंग्लिश गाणं!

Video: अमृता फडणवीस इज बॅक; आता लाँच केलं इंग्लिश गाणं

फडणवीसांच सरकार गेल्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस चांगल्याचं चर्चेत आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केल्यामुळे त्यांच्या विरोधात निषेध करण्यात आला होता. मात्र आता अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांना संगीत आणि गाण्याची किती आवड आहे हे सर्वांच माहित आहे. त्यामुळे त्यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने इंग्रजी गाणं गायलं आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘हॅलो’ असं या गाण्याचं नाव असून लिओनेल रिची याचं हे मूळ गाणं आहे.

या गाण्यामुळे नेटकरी पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांना ट्रोल करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना असं लिहिलं, अंधाराला अंधार नाही फक्त प्रकाश संपवू शकतो आणि रागाला राग संपवू शकत नाही फक्त प्रेम संपवू शकतं, असं म्हणतं त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या अमृता फडणवीस यांचं ‘हॅलो’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या आवाजाची खिल्ली उडवली आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांची तुलना राणू मंडल सोबत केली आहे.


हेही वाचा – जयश्री भोज यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार


 

First Published on: February 14, 2020 8:20 PM
Exit mobile version