लोकसभेच्या निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फूट

लोकसभेच्या निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फूट

लोकसभेच्या निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फूट

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजीनामा दिला आहे. यासंदर्भात पखाले यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अपयशात आम्ही वाटेकरी ठरु नये, म्हणून आम्ही राजीनामा दिला, असे मिलिंद पकाले म्हणाले आहेत. या राजीनाम्यानंतर पखाले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाले मिलिंद पखाले?

मिलिंद पखाले म्हणाले की, ‘आंबेडकर सामाजाला वेगळे वळण मिळेल म्हणून १२ वर्षांपूर्वी भारिप बहुजन महासंघात सामील होऊन प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारले होते. मात्र, आजची भारिप केवळ सत्ता संपादनाचे खोटे स्वप्न दाखवत आहे. वंचित आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नाही. उलट वंचित आघाडीमुळे भाजपला ७ ते ८ जागांवर जिंकून येण्यास मदत होईल. वंचित आघाडीच्या ९९ टक्के उमेदवारांची डिपॉजीट जप्त होईल. वंचित बहुजन आघाडीचा सहकारी असलेल्या एमआयएमने केवळ एकाच जागेवर निवडणूक लढवून आपला बाणा सिद्ध केला आहे. असा बाणा वंचित आघाडीला देखील दाखवता आला असता, मात्र त्यांनी तो दाखवला नाही.’

First Published on: May 18, 2019 6:17 PM
Exit mobile version