‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण; बंदला राज्यात कुठे, कसा आला प्रतिसाद?

‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण; बंदला राज्यात कुठे, कसा आला प्रतिसाद?

'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण

नागरिकत्वच्या विरोधात आज, शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदला राज्यातील काही ठिकाणी हिंसक वळण आले आहे. सोलापुरातील बुधवार पेठ परिसरात सिटी बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच अशा घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

बारामतीत बाजारपेठा बंद

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला बारामतीकरांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. शहरातील बहुतांशी बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या आहेत.

मनमाडमध्ये शेतकऱ्यांची गैरसोय

‘महाराष्ट्र बंद’मध्ये बाजार समितीदेखील सहभागी झाली असून लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

अकोल्यात बंदला अल्प प्रतिसाद

नागरिकत्वच्या विरोधात राज्यव्यापी बंदला अकोला शहरात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, परिक्षा सुरु असल्यााने शाळा, महाविद्यालय सुरु आहेत.

शिर्डीत कोणताही परिणाम नाही

या बंदचा शिर्डीत कोणताच परिणाम दिसून येत नाही. साईमंदिरात भक्तांची गर्दी कायम असून दर्शनरांगा भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. साईसंस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, रूग्णालयाबरोबरच शाळा कॉलेज सुरळितपणे सुरू आहे.

कोल्हापूरचे जनजीवन सुरळीत

पश्चिम महाराष्ट्रामध्येही आजच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला नसून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत आहे.

वर्ध्यात जनजीवन सुरळीत

वंचित बहुजन आघाडीने एनआरसी आणि सिएए विरोधात पुकारलेल्या राज्यस्तरीय बंदला वर्ध्यात प्रतिसाद मिळालेला नाही. शहरातील एसटी, पेट्रोल, शाळा – महाविद्यालय सुरळीत चालू असून सध्यातरी बंदचा कोणताही परिणाम दिसून येत नाही.


हेही वाचा – शरद पवारांच्या पत्रानंतर भीमा-कोरेगाव प्रकरणाची पुन्हा चौकशी


First Published on: January 24, 2020 12:51 PM
Exit mobile version