निसर्ग चक्रीवादळासाठी खबरदारी, यंत्रणा सतर्क

निसर्ग चक्रीवादळासाठी खबरदारी, यंत्रणा सतर्क

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार निसर्ग चक्रीवादळामुळे बुधवारी 3 जून रोजी पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील सर्व उद्योग, उद्योग आस्थापना, सर्व दुकाने, खाजगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

या चक्रीवादळामुळे वसई, पालघर, डहाणू तालुक्यामध्ये हानी होण्याची शक्यता असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या परिस्थितीचा विचार करून पालघरमधील वसई, पालघर, डहाणू तालुक्याच्या किनारपट्टीवर राहणार्‍या लोकांची सुरक्षा अबाधित रहावी तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी तसेच आर्थिक हानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले आहेत. चक्रीवादळाच्या अनुषंगाने औद्योगिक आस्थापनांनी कारखान्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच 1 दिवसाच्या शटडाऊनमध्ये कुठलेही सांडपाणी अथवा वायू उत्सर्जन करू नये असे आदेश दिलेेत.

अत्यावश्यक सेवा व दुकाने मात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. चक्रीवादळाचा संभाव्य तडाखा वसई तालुक्यातील चांदीप, पाचूबंदर, सायवन, कामण, ससूनवघर, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोडी, भुईगाव या 12 गावांना बसणार आहे. 12 हजार 530 लोकांना त्याचा फटका बसू शकतो. पालघर तालुक्यातील सातपाटी, जलसारंग, मुरबे, उच्छेळी, दांडी या गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये वीज पुरवठा बंद करण्यात आला आह

डहाणू तालुक्यातील नरपड, आंबेवाडी, चिखले तर तलासरी तालुक्यातील झाई गावाला चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो. खबरदारी म्हणून तालुक्यातील बावीस गावातील मातीच्या, कच्च्या, धोकादायक घरातील लोकांना शाळा, आश्रमशाळा आदी सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

आज रात्री नाशिकमध्ये ११ वाजता धडकणार

ताशी शंभर किमी वेगाने प्रवास ,समुद्रकिनारी कुणीही जाऊ नये, समुद्रकिनारी कुणीही जाऊ नये

अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ तीन जूनला कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे तीन व चार जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना या वादळाचा धोका हवामान विभागाने वर्तवला आहे. हे वादळ नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.३) रात्री अकराला प्रवेश करणार असल्याचे हवामान विभागाने कळवल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. दरम्यान आपत्ती निवारण कक्षामार्फत या वादळापासून बचावासाठी नागरिक व प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रात दक्षिणेकडे तयार झालेले वादळ वेगाने उत्तरेकडे सरकत असून ते महाराष्ट्रातील किनारपट्टीचा भाग व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना प्रभावित करणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. या वार्‍यांचा वेग ताशी शंभर किलोमीटर आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर जीवित व मालमत्तेचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी आपत्ती निवारण कायद्यानुसार सर्व त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सर्व सरकारी विभागांना दिले आहेत. तसेच त्या त्या भागात केलेल्या उपाययोजनांचे अहवाल कळवण्यास सांगितले आहे. सध्या करोना विषाणू महामारी सुरू असल्यामुळे तेथील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवणे, तेथील वीज पुरवठा सुरळीत राहील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

महावितरणचे आवाहन
भारतीय वेधशाळेच्या इशार्‍यानुसार निसर्ग चक्रीवादळाचा नाशिक जिल्ह्यालाही ३ व ४ जून रोजी फटका बसणार आहे. यामुळे नाशिकमधील वीजपुरवठा दीर्घकाळासाठी प्रभावित होण्याचा धोका आहे, हे लक्षात घेऊन नागरिकांनी विजेवर अवलंबून असणारी इनव्हर्टर चार्ज करणे, वीज पंपाद्वारे पाण्याची टाकी भरणे आदी कामे त्या आधीच पूर्ण करून घ्यावीत. म्हणजे चक्रीवादळाच्या काळात नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन
निसर्ग चक्रीवादळासोबत अतिवृष्टी होण्याचीही शक्यता असून वार्‍यांचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक असणार आहे. यामुळे वादळाच्या काळात नागरिकांनी घरातच थांबावे. शेतकर्‍यांनी त्यांचा काढणी केलेला शेतमाल सुरक्षितस्थळी हलवावा. जनावरांचा सुरक्षित ठिकाणी बंदोबस्त करावा. वाहने झाडांखाली उभी करू नयेत. नागरिकांनी या काळात मोकळ्या मैदानात व झाडांखाली उभे राहू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

First Published on: June 3, 2020 7:03 AM
Exit mobile version