आयत्या बिळावर नागोबा होऊन राणेंना विमानतळाचं श्रेय घेता येणार नाही – विनायक राऊत

आयत्या बिळावर नागोबा होऊन राणेंना विमानतळाचं श्रेय घेता येणार नाही – विनायक राऊत

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सेना-भाजप श्रेयवाद पेटला असून आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर थेट टीका केली आहे. आयत्या बिळावर नागोबा होऊन विमानतळाच्या उद्घाटनाचं श्रेय नारायण राणे यांना घेता येणार नाही, असं राऊत म्हणाले. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राणेंवर थेट टीका केली. यावेळी त्यांनी विमानाच्या उड्डाणाची तारीख आणि वेळ जाहीर केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली. यानंतर आता विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राणेंवर पलटवार केला आहे. नारायण राणे यांनी १९९९ मध्ये मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलं. त्यानंतर २००९ साली पुन्हा एकदा भमिपूजन झालं. राणेंनी भूमिपूजन केल्यानंतर तब्बल २२ वर्षांनी विमानतळआचं काम पूर्ण झालं. चार वर्ष खासदार राहिले. परंतु एकदाही राज्यसभेत विषय मांडला नाही. परंतु फुशारक्या मारताना जरा भान ठेवा, अशी टीका राऊत यांनी केली.

मुहूर्ताची तारीख ठरली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन उड्डाण कधी होणार याची प्रतिक्षा सर्वांना होती, सर्वांच्या प्रयत्नातून याची तारखी निशअचित झाली आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षात विमानतळासंदर्भात चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री गजपतीराजू, हरदीप सिंग पुरी, सुरेश प्रभू आणि आताचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे अशा चार नागरी विमान वाहतूकमंत्र्यांबरोबर अनेकवेळा संपर्क साधून पाठपुरावा केला.

मी गेली ७ वर्ष विमान सल्लागार समितीमध्ये हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. या सगळ्या प्रयत्नाला यश आलं असून या विमानतळावरुन नियमितपणे हवाई वाहतूक सुरु झाल्याचं निश्चित झालं आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी सकाळी ११ वाजता दुरध्वनीवरुन चर्चा केली आणि उड्डाणाच्या मुहूर्ताचा दिवस निश्चित केला. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १२ वाजता उड्डाण होणार असून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी विमानाचं लँडिंग होईल. हे ७२ सीट्स असलेलं विमान ६ तारीखला आलेलं आहे, असी माहिती विनायक राऊत यांनी दिली.

 

First Published on: September 8, 2021 12:29 PM
Exit mobile version