विदर्भातील सर्वच जिल्हे ‘डेंजर झोन’मध्ये; कमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

विदर्भातील सर्वच जिल्हे ‘डेंजर झोन’मध्ये; कमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

राज्यात अनेक ठिकाणी मान्सून (Monsoon) सक्रिय झाला असून, मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अद्याप विदर्भात पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय पावसाने वेळेत हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या खूप कमी पाऊस पडला आहे. जून महिना संपला तरी अद्याप पावसाने पुरेशी हजेरी लावलेली नाही. जूनमध्ये नागपूर जिल्ह्यातच नव्हे, संपूर्ण विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १ ते ३० जूनदरम्यान विदर्भात सरासरीच्या (१७५ मिलिमीटर) केवळ ६१ टक्के (१०६ मिलिमीटर) बरसला. पण हा पाऊस ३९ टक्के कमी होता.

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १३६ मिलिमीटर पाऊस

हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात आतपर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानुसार, केवळ ८५ मिलिमीटर पडला असून, अमरावती व वर्धा जिल्ह्यांत प्रत्येकी ९१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १३६ मिलिमीटर पाऊस पडला.

परिणामी, विदर्भातील सर्वच जिल्हे सध्या ‘डेंजर झोन’मध्ये आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बळीराजाच्या सर्व आशा आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांवर आहे. या महिन्यांत समाधानकारक पाऊस पडला तरच बंपर पीक होणार आहे.


हेही वाचा – शरद पवारांना भारतीय कुस्ती संघटनेचा धक्का: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदचं बरखास्त

First Published on: July 2, 2022 11:39 AM
Exit mobile version