VIDEO: औरंगाबाद लॉकडाऊन रद्द, आमदार जलील यांचा जल्लोष; कोरोनाचे नियम पायदळी

VIDEO: औरंगाबाद लॉकडाऊन रद्द, आमदार जलील यांचा जल्लोष; कोरोनाचे नियम पायदळी

VIDEO: औरंगाबाद लॉकडाऊन रद्द, आमदार जलील यांचा जल्लोष; कोरोनाचे नियम पायदळी

औरंगाबादमध्ये आजपासून (३१ मार्च) संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. लॉकडाऊन रद्द केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह एकच जल्लोष केला आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होते मात्र खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. लोकप्रतिनिधीकडूनच औरंगाबादमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे.

औरंगाबादमध्ये आजपासून सुरु होणारा लॉकडाऊन रद्द झाला आहे. यामुळे इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी मंगळवारी काल जलील यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. यावेळी जलील यांना कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून जंगी मिरवणूक काढून जल्लोष केला आहे.

कोरोनाच्या नियमांचे लोकप्रतिनिधींकडून होत असताना सर्वसामान्यांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा का उगारला जातोय असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे. जलील यांची मिरवणूक काढताना एकाही कार्यकर्त्याच्या तोंडावर मास्क नव्हता तसेच स्वतः जलील यांनीही मास्क घातला नाही. गर्दीमुळे सामाजिक अंतराचे भान कोणीही राखले नसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करुन जल्लोष केला यामुळे जलील यांच्यावर कारवाई होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

छोट्या दुकानांसह ‘या’ गोष्टी राहणार सुरु

ऑरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. परंतु जिल्ह्यामध्ये काही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. छोटी दुकाने, बांधकाम व्यवसाय,दुचाकी, तसेच चार चाकी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली असून काही नियम लागू करण्यात आले आहेत.

First Published on: March 31, 2021 10:38 AM
Exit mobile version