‘या’ गावात ३५ वर्षांपासून स्मशानभूमी नाही…

‘या’ गावात ३५ वर्षांपासून स्मशानभूमी नाही…

प्रातिनिधिक फोटो

कुठल्याही गावामध्ये जा तिथे नदी किंवा ओढ्याच्याकडेला एकतरी स्माशनभूमी असतेच. राज्यात अनेक गावं अशी आहेत जिथे अद्याप पाण्याची किंवा वीजेची सोय पोहचलेली नाही पण तिथे स्मशानभूमी मात्र आहे. कारण माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीतच केले जातात. मात्र, महाराष्ट्रामध्ये असं एक गाव जिथे एकही स्मशानभूमी नाही. खडकुत असं या नावाचं गाव असून, सुरुवातीपासूनच या गावात एकही स्मशानभूमी नाही. त्यामुळे या गावात कुणाचं निधन झाल्यास नाल्याच्या किनारी उघड्यावरच त्याचे अंतिम संस्कार केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी हीच परिस्थीती आहे. नांदेड तालुक्यातील हे खडकुत गाव अर्धापूरपासून केवळ ५ किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या ३५ वर्षांपासून या गावामध्ये स्मशानभूमीच नाही. त्यामुळे गावातील मृत व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे असल्यास गावकऱ्यांना गावापासून दूर ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्याकाठी जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. असं म्हणतात की, एकाद्याला जिवंतपणी कितीही कठीण प्रवास करावा लागला असले, तरी मृत्यूनंतर त्याचा प्रवास सुरळीत व्हायला हवा. मात्र, खडकुतवासीयांच्या नशिबी मृत्यूनंतरचा प्रवासही काहीसा कठीण असल्याचंच म्हणावं लागेल.

वाचा: एवढं मारेन की कानातून रक्त येईल – ओवेसी

दरम्यान, स्मशानभूमी नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. शासनाकडे वेळोवेळी या समस्येबाबत लेखी निवेदन देऊन स्मशानभूमी बांधून देण्याची मागणी केली आहे. मात्र, आजपर्यंत खडकुतवासीयांना स्मशानभूमीसाठी जागा मिळालेली नाही. देशात लोकशाही येऊन इतकी वर्ष झाली तरीही आम्हाला अंत्यसंस्कारांसाठी हक्काची स्मशानभूमी मिळत नाही, ही शासनासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट अाहे, अशा शब्दांत येथील ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, गावात स्मशानभूमी हवी असल्याची मागणी गावकऱ्यांनी वारंवार केली. त्यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा देखील केला. मात्र, शासन दरबारी आमच्या मागणीला काहीच किंमत नसल्याचं दिसतंय. ग्रामस्थ शेतात किंवा नदीच्याकडेला मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करतात. गावाला स्मशानभूमी  न देणे हा एकप्रकारे त्या पार्थिवाचा अपमान असल्याचं, गावचे सरपंच सांगतात.

First Published on: December 3, 2018 1:52 PM
Exit mobile version