सरकारी यंत्रणांवर ताण आहे मान्य पण यातून सरकार बोध घेणार की नाही – राज ठाकरे

सरकारी यंत्रणांवर ताण आहे मान्य पण यातून सरकार बोध घेणार की नाही – राज ठाकरे

सरकारी यंत्रणांवर ताण आहे मान्य पण यातून सरकार बोध घेणार की नाही - राज ठाकरे

नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे २४ जणांनी आपला जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालय या कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली. या आगीत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य पण यातून सरकार बोध घेणार की नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेली आग ही दुर्दैवी आणि क्लेशदायी असल्याचं म्हटलं आहे. भंडाऱ्यातील घटना असो की भांडुप मधली घटना तसंच परवाच घडलेली नाशिकमधील घटना असो यातून सरकारने बोध घ्यायला हवा. प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडाऱ्यातील घटना असो की भांडुप मधली घटना. या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत,” अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की…

Posted by Raj Thackeray on Thursday, 22 April 2021

First Published on: April 23, 2021 10:19 AM
Exit mobile version