Virar Global City News : सांडपाणी प्रकल्पात गुदमरून चौघांचा मृत्यू; विरारच्या ग्लोबल सिटीतील घटना

Virar Global City News : सांडपाणी प्रकल्पात गुदमरून चौघांचा मृत्यू; विरारच्या ग्लोबल सिटीतील घटना

विरार : सांडपाणी प्रकल्पांतर्गत सफाई करण्यासाठी उतरलेल्या चार कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विरारमधील ग्लोबल सिटी येथे घडली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. (Virar Global City News Four die of suffocation in sewage plant Virar)

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७) निखिल घाटाळ (२४) आणि सागर तेंडुलकर (२९) अशी मृतांची नावे आहेत. विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात रुस्तुमजी शाळेजवळील खाजगी सांडपाणी प्रकल्प आहे. याच प्रकल्पात मंगळवारी दुपारच्या सुमारास चोकअप झाले होते. हे चोकअप दुरूस्त करण्यासाठी एक कर्मचारी 25 ते 30 फूट खोल असलेल्या टाकीत उतरला. मात्र बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने दुसरा कर्मचारी टाकीत उतरला, तोही परत न आल्याने तिसरा कर्मचारी टाकीत उतरला. दोघांचा शोध घेण्यासाठी तिसरा कर्मचारी टाकीत उतरला असता, तो देखील बाहेर न आल्याने चौथा कर्मचारी टाकीत उतरला. मात्र चौथा कर्मचारीही बाहेर आला नाही.

हेही वाचा – निवडणुकीच्या कामाला महसूल अधिकारी, कार्यालयात शुकशुकाट 

अखेर अधिक शोध घेतला असता, चौघांचा या टाकीत गुदमरून मृत्यू झाल्याचे उर्वरित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनंतर तातडीने अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.

दरम्यान, सांडपाणी प्रकल्पात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेतची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याची गंभीर बाब आता उजेडात आली आहे. तसेच यासांडपाणी प्रकल्पाची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – RAJ THACKERAY GUDI PADWA 2024 : मनसेच्या पाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात; राज ठाकरे कोणती भूमिका घेणार?

First Published on: April 9, 2024 3:58 PM
Exit mobile version