घरताज्या घडामोडीRaj Thackeray Gudi Padwa 2024 : मनसेच्या पाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात;...

Raj Thackeray Gudi Padwa 2024 : मनसेच्या पाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात; राज ठाकरे कोणती भूमिका घेणार?

Subscribe

raj thackeray speech shivaji park दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पाडवा मेळावा होतो. यंदाही हा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व मनसैनिकांना संबोधित करणार आहेत.

मुंबई : दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पाडवा मेळावा होतो. यंदाही हा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. (raj thackeray speech shivaji park) यासाठी शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मैदानात मोठा स्टेज बांधण्यात आला असून मनसेची गुढी उभारण्यात आली आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार आहे. यासाठी राज्यभरातून अनेक मनसैनिक शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत. (Raj Thackeray Gudi Padwa 2024 MNS Leader Raj Thackeray Will Speech At Shivaji Park)

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी तीन जागांचा प्रस्ताव मनसेने महायुतीसमोर ठेवल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी नेमकं काय घडलं? काय चर्चा झाली? याबाबत सविस्तर चर्चा करायची आहे. काय घडलं ते सांगायचं आहे? तसेच, नेमकं काय घडलं? ते गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगीन असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे आजच्या मेळाव्यात नेमकं राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांना…; गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर निशाणा

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंपूर्वी मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि प्रकाश महाजन कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज होणाऱ्या मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याला शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, किशोर शिंदे यांच्यासह मनसे नेते उपस्थित राहणार आहे. raj thackeray latest speech today

- Advertisement -

गुढीपाडवा मेळाव्यासाठी जय्यत तयारी

  • मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये करण्यात आली.
  • स्टेजच्या शेजारी लावलेल्या भल्या मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.
  • संपूर्ण मैदानात झेंडे लावण्यात आले आहेत.
  • शिवाजी पार्कातील वातावरण भगवमय झाले आहे.
  • स्टेजच्या डाव्या बाजूला मोठी गुढी उभारण्यात आली आहे.

हेही वाचा – SANGLI LOK SABHA : काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -