घरपालघरनिवडणुकीच्या कामाला महसूल अधिकारी ,कार्यालयात शुकशुकाट 

निवडणुकीच्या कामाला महसूल अधिकारी ,कार्यालयात शुकशुकाट 

Subscribe

मात्र जनतेचे उत्पन्न, रहिवाशी व जातीचे दाखले व ज्येष्ठ नागरिक दाखला आणि महिला आरक्षण दाखला आणि क्रिमिलेअर प्रमाणपत्रे यांची येत्या आर्थिक वर्षात गरज असल्याने त्यांचीही कामे होताना दिसत नाहीत. 

भाईंदर :- एकीकडे निवडणुकीची आचार संहिता लागू झाली आणि दुसरीकडे जनतेच्या लोकाभिमुख महत्त्वाच्या मीरा भाईंदर अपर तहसीलदार महसूल कार्यालयात शुकशुकाट असून त्यात कोणताच अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने जनतेला आपली कामे होत नसल्याने पदरी निराशा घेऊन परत जावे लागत आहे. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्या दाखल्याची कामे होत नाहीत . तसेच दुसरीकडे याच गोष्टींचा फायदा घेऊन भूमाफियांनी डोके वर काढत कांदळवन परिसरात व ईको सेन्सेटिव्ह भागात भरणी जोरात सुरू केली असून त्यातच कांदळवनाची कत्तलही केली जात आहे.
दरम्यान मीरा भाईंदरचे अपर तहसीलदार हे प्रमुख शासकीय बैठक अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंगसाठी जातात तेेव्हा कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसते. मात्र आचार संहितेत बहुतांश कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी वर्ग केलेले आहेत. मात्र, उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी कोणी जर गैरहजर असेल तर त्यांचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा गौंड यांनी दिला आहे. आचार संहिता लागू होऊन आज जवळपास २३ दिवसांचा कालावधी लोटला आहे. अशा स्थितीत सर्वच शासकीय कार्यालये आणि प्रामुख्याने मीरा भाईंदर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये ओसाड पडली आहेत. त्यापैकीच मीरा भाईंदर मधील प्रमुख अपर तहसीलदार कार्यालयावर आचारसंहितेचा मोठा परिणाम जाणवून येत आहे. सोमवारी तर महसूल विभागाला सुट्टी आहे की काय, असा प्रश्न पडावा इतका शुकशुकाट कार्यालयात ही निर्माण झाला होता. आचारसंहितेमुळे नव्याने कोणतेही कामे मंजूर होत नाहीत. मात्र जनतेचे उत्पन्न, रहिवाशी व जातीचे दाखले व ज्येष्ठ नागरिक दाखला आणि महिला आरक्षण दाखला आणि क्रिमिलेअर प्रमाणपत्रे यांची येत्या आर्थिक वर्षात गरज असल्याने त्यांचीही कामे होताना दिसत नाहीत.
आचार संहितेच्या नावाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने अतिसंवेदनशील सीआरझेड, पाणथळ, बफर झोन व मँग्रोव्ह भागात कांदळवन भरणी व कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी असताना त्यात शहरातील नवीन बनत असलेल्या इमारती व सिमेंट रस्ते व मेट्रो लाईन यांच्यातून निघणारा राडा रोडा व डेब्रिज टाकून पर्यावरणाचा ह्रास सुरू आहे. त्याकडे महसूल विभागाचे मात्र अधिकारी कर्मचारी नसल्याने दुर्लक्ष होत आहे. यावर तातडीने जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज असून सामान्य जनतेच्या कामांना प्राध्यान देऊन त्यासोबत निवडणुकीचे काम करावे. मात्र सरसकट निवडणुकीच्या कामात व्यस्त न-ठेवता जनतेची कामे करायला लावावीत, असे सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी म्हटले आहे.
प्रतिक्रिया,
कांदळवन व अन्य महत्वाच्या कामकाजाच्या बाबींबाबत ठाणे जिल्हाधिकारी यांना सांगितले असून लवकरच त्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
– महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त कोकण भवन
याबाबत अपर तहसीलदार यांच्याशी बोलून जनतेच्या कामाकडे लक्ष देण्यास सांगितले जाणार आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाईल.
– सुदाम परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे
निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाल्याने मंडळ अधिकारी व तलाठी ते काम करत आहेत. तसेच आम्ही आमच्या सोयीनुसार जनतेचे काम तत्परतेने करत आहोत. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या कामाला प्राध्यान देऊन काही प्रमाणात कामे सुरू आहेत.
–  निलेश गौंड, अपर तहसीलदार, मीरा भाईंदर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -