करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडाळागाव ‘सील’

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडाळागाव ‘सील’

कोरोना

नाशिक शहरातील दाटलोकवस्ती असलेल्या वडाळागावात करोनाने धुमाकूळ घातला आहे. वडाळागाव करोनाचे हॉटस्पॉट झाले असून हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील २९ रुग्ण करोनाबाधित आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहे. महापालिका व पोलिसांनी वडाळागावात बॅरिकेड लावून सर्व रस्ते बंद केले आहेत.

शहरातील वडाळागाव परिसरात १९ मे रोजी पहिला बाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर वडाळागाव करोनाचे हॉटस्पॉट झाले असून बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १ जूनपर्यंत नवे २९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये मुमताजनगर ८, मेहबुबनगरमध्ये ९ नवे रुग्ण बाधित आहेत. व्हिनस सोसायटीत एकाच दिवशी सात नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, रजा चौक, झीनतनगर या गावठाण भागासह झोपडपट्टी परिसरात बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. वडाळागावातील वडाळा चौफुली येथील महारूद्र हनुमान मंदिरासमोरील मुख्य रस्ता, संत सावतामाळी कॅनॉल रस्त्याला जोडणारे गणेशनगर, जय मल्हार कॉलन्यांचे उपरस्ते, तैबानगर व मदिनानगर या भागाला जोडणारे शंभर फुटी रस्त्यावरील उपरस्ते, सादिकनगर, मुमताजनगर, महेबुबनगरकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

First Published on: June 2, 2020 2:50 PM
Exit mobile version