पुण्यात पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळून ६ मजुरांचा मृत्यू

पुण्यात पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळून ६ मजुरांचा मृत्यू

पुण्यात पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळून ६ मजुरांचा मृत्यू

पुण्यात पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळून ६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. याअगोदर रविवारी रात्री पुण्याच्या कोंढवा येथील अलकॉन स्टायलीश इमरातीची संरक्षण भिंत कोसळून ११ मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे संरक्षण भिंत कोसळून ६ मजुरांचा हकनाक बळी गेला आहे. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचालित वेणूताई चव्हाण पॉलिटेक्निकल कॉलेजची ही संरक्षण भिंत होती. या भिंतीच्या पाठीमागे मोकळी जागा असल्यामुळे तिथे काही मजुरांच्या चार ते पाच झोपड्या होत्या. ते नुकतेच काही दिवसांपूर्वी त्या झोपड्यांमध्ये राहायला आले होते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भिंतीमध्ये पाणी मुरले आणि जमीनदेखील भुसभुशीत होऊन संरक्षण भिंत कोसळली.

मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

संरक्षण भिंतीच्या पाठीमागे असणाऱ्या झोपड्यांमध्ये साधारणत: १२ ते १५ मजूर वास्तव्यास होते. बांधकाम व्यावसायिक एस. के. दांगड यांच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ते तीन आठवड्यांपूर्वी या झोपड्यांमध्ये राहत होते. परंतु, संरक्षण भिंत कोसळल्यामुळे या झोपड्यांमधील सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून चार मजूर जखमी आहेत. मृतांमध्ये चार पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री बाळा भेडगे यांनी दिली आहे.

First Published on: July 3, 2019 9:39 AM
Exit mobile version