वारणा धरणात ३२.४६ टीएमसी पाणीसाठा

वारणा धरणात ३२.४६ टीएमसी पाणीसाठा

वारणा धरण

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी ३२.४६ टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये १०२.५५ टीएमसी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी , धोम धरणात १२.४२ टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता १३.५० टी.एम.सी, कन्हेर धरणात ९.१४ टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता १०.१० टीएमसी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात २४.१४ टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता २५.४० व राधानगरी धरणात ८.२१ टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता ८.३६ टीएमसी आहे. अलमट्टी धरणात १००.७९ टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता १२३ टीएमसी असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

तसेच सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून १३५१५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणातून ४८८९३ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून ५ लाख ४० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे ५१ फूट १ इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी ४५ फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे ५६ फूट ९ इंच इतकी पाण्याची पातळी आहे तर त्याची धोका पातळी ५० फूट ३ इंच इतकी आहे.

First Published on: August 12, 2019 2:26 PM
Exit mobile version