मुंबईत मान्सून सक्रिय, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

मुंबईत मान्सून सक्रिय, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

गेल्या महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने बॅटिंग सुरू केली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. (Water logging in the low lying area in the mumbai)

हेही वाचा – मुंबईत मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या परिसरात पावसाचा जोर वाढला असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे अनेकठिकाणी पाणी साचलं होतं. मात्र, मध्यरात्री पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी ओसरले. परंतु, आज पहाटेपासूनच पावसाने पुन्हा बॅटिंग सुरू केल्याने मुंबईच्या अनेक रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

काल दिवसभर पाऊस झाल्याने परळच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं होतं.
Photo By – Deepak Salvi

दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, पुढील चार ते पाच दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय होईल असंही सांगण्यात येतंय. दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सब झूठ, सामनातून टीका

बुधवार रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. गुरुवारी सकाळापासून पावसाने जोर धरला. त्यामुळे गुरुवारी सायंकळी कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांची पावसामुळे दैना झाली. मात्र, मध्यरात्री पावसाने उसंत घेतल्याने पाणी ओसरले. दरम्यान, आज सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मुंबईत गुरुवारी सकाळी ८ ते रात्री ८.३० पर्यंत बारा तासात कुलाबा १७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, सांताक्रुजमध्ये 137 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

First Published on: July 1, 2022 8:18 AM
Exit mobile version