नवी मुंबईतील ‘या’ भागांत 24 मे रोजी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबईतील ‘या’ भागांत 24 मे रोजी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई (navi mumbai) महापालिकेच्या काही भागात येत्या मंगळवार 24 मे रोजी पाणीपुरवठा (water supply) बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबईतील मोरबे धरण (Morabe Dam) ते दिघा मुख्य जलवाहिनी (Digha main aqueduct) आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, बुधवारीही पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

हेही वाचा – लातूरकरांना तब्बल 45 दिवसांनंतर स्वच्छ पाणीपुरवठा सुरू

पावसाळ्याला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. शिवाय, पावसाळ्यात पाणीपुरवठ्याची कामे करताना अडथळे येतात. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेकडून (Navi Mumbai Municipal Corporation) पावसाळापूर्व कामे ही युद्ध पातळीवर केली जात आहेत. तसेच, या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे.

दरम्यान, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या भागांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्याबाबतीच काही कामं राहून गेली असल्याने ती काम आता पावसाळ्यापूर्वी करण्यात येत आहेत.


हेही वाचा – पश्चिम उपनगरातील पोईसर नदीपात्रातील 16 बांधकामे जमीनदोस्त

First Published on: May 20, 2022 9:32 PM
Exit mobile version