ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी काही भागातील पाणीपुरवठा बंद

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी काही भागातील पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत होणार पाणी पुरवठा येत्या
शुक्रवार २४ मार्चला दुपारी १२ वाजल्यापासून शनिवार २५ मार्च २०२३ दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, मुंब्रा प्रभाग समिती मधील वाय जंक्शन ते मुंब्रा फायर ब्रिगेड परिसरापर्यंत व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. महापालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे पालिकेस सहकार्य करावे असे नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री मनसे कार्यालयात, आमदार राजू पाटील यांनी केले एकनाथ शिंदेंचे स्वागत


 

First Published on: March 22, 2023 3:40 PM
Exit mobile version