महाराष्ट्रातील जनतेसमोर तुझे वस्त्रहरण करू; आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

महाराष्ट्रातील जनतेसमोर तुझे वस्त्रहरण करू; आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

-तेजस्वी काळसेकर

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. ज्यांनी महाविकास माघाडीची सत्ता होती तेव्हा एक सुद्धा परदेशी दौरा स्वतःच्या पैशाने केला नाही. त्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांवर टीका करण्याचे धाडस करू नये. स्वतःच्या खिशात हात घालून स्वतःचे पैसे खर्च करणे ठाकरे कुटुंबाच्या कुंडलीतच नाही. अंगावरील वस्त्रांपासून घड्याळ, गाडी, जे दुसऱ्याच्या पैशातून वापरतात अशा आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सत्तेच्या वेळी दावोसचा दौरा केला, त्यावेळी काय दिवे लावले? स्वतःचा म्याऊ म्याऊ असलेला आवाज बदलण्यासाठी कोणते उपचार घेतले? कोणत्या कोकिळे बरोबर मीठू-मीठू गात होता, याची खड्यान खडा माहीती माझ्याकडे आहे खूप खोलात उतरायला लावू नका तुमचे परदेश दौरयातील फोटो आटनरी सकट जाहीरात करू आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर तुझे वस्त्रहरण करू असा इशाराच भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना दिला आहे. (We will strip you of your clothes in front of the people of Maharashtra MLA Nitesh Ranes warning to Aditya Thackeray)

आमदार नितेश राणे यांनी कणकवली ओम गणेश निवासस्थानी माध्यमांशी रविवारी (1 ऑक्टोबर) संवाद साधला. त्यावेळी त्यानी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला. पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, कालपासून आदित्य ठाकरेने म्याव म्याव सुरू केली आहे. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा व उद्योग मंत्र्यावर टीका असे प्रकार सुरू आहेत. ज्यांनी स्वतःच्या खिशातून कधीच खर्च केला नाही, त्या आदित्य ठाकरे याची गाडी एका आमदाराच्या मेडिकल कॉलेजच्या नावाने आहे. ज्या घरात राहतात त्याचे एसी दुसऱ्याने दिलेले आहेत. त्यांनी यापुढे टीका करताना दोन वेळा विचार करावा. दावोसला गेला होता तेव्हा काय रंग उधळलेले आहेत ते आम्हाला माहित आहे. कोणत्या कोकिळे बरोबर मिंटू मिटू गात होता हे सुद्धा आम्हाला माहित आहे. जर तू परत आरोप केले तर तुझ्या दौऱ्याची खरी माहिती जनतेला देणार असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

हेही वाचा : …आणि मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकारी, कंत्राटदाराला झापले; एसआरए वसाहतीला अचानक भेट

स्वतःला सिद्ध करण्यासाठी आदित्य ठाकरे आरोप करतायेत

तेजस आणि आदित्य यांच्यामधील संघटनात्मक स्पर्धा वाढलेली आहे. त्यातून हे आरोप स्वतःला सिद्ध करण्यासाठी आदित्य ठाकरे करत आहे. असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला. दोन्ही भावात स्पर्धा म्हणून हे चालले आहे. लहान भावाने ग्रीप पकडली आहे त्याला मागे टाकण्यासाठी छोट्या भावाला लहान करण्यासाठी आदित्य हा प्रकार आहे. कोविड काळात ती पार्टी आणि त्याचे बिल चे फोटो कोणी दिले याची माहीती द्या, लंडनमधले तेजसचे फोटो कोणी पाठवले. ते मातोश्रीवरूनच भाजपच्या आमदारांना गेले. त्याचा शोध घ्या, तुम्ही आपसात भांडत रहा मात्र तुमच्या भांडणात आम्हाला घेवू नका. भाजपवर टीका करू नका नाहीतर तुमचा खरा कार्यक्रम जाहिरात करू आणि कोणासोबत होता हे सांगू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

हेही वाचा : दहिसर येथे वर्धमान इंडस्ट्रियलमधील गाळ्यांना आग; सुदैवाने जीवितहानी टळली

जरांगे पाटील यांच्याकडे विनायक मेटेंचे काम पुढे नेण्याची संधी

जरांगे पाटील यांनी सरकार काम करत आहे त्याची माहिती घ्यावी. जे काम स्व. विनायक मेटे यांनी सुरू केलेले ते पुढे नेण्याची संधी जरांगे पाटील यांनी घ्यावी. उगाच टीका करत बसू नये, महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही संतासारखे वागले नाही. आमच्या घरावर बुलडोझर घेऊन तिनशे-तिनशे अधिकारी पाठवले तेव्हा आम्ही शेंबडया मुलासारखे, तुम्ही रडता तसे रडत राहिलेले नाही. योग्य पद्धतीने उत्तर दिले आणि सत्याची बाजू आमची असल्यामुळे न्याय मिळाला. रोहित पवारा किंवा अन्य कोणाला नोटीस आली असतील तर त्यांनी प्रक्रियेला सामोरे जावे असेसुद्धा त्यांनी यावेळी सुनावले.

अंबादास दानवे यांचे पद काढून घ्यायचे आहे

यावेळी पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, यापूर्वीच मी सांगितलेले आहे की, अंबादास दानवे यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काढून घ्यायचे आहे, म्हणूनच त्यांच्यावर ओबीसी प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने मिळवण्याचा आरोप केला जातोय. ही एक नवीन चाल आहे. आता हे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला हवे आहे म्हणून हा प्रकार चाललेला आहे. यांची तीन डोकी एकत्र राहत नाहीत आणि चालले पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करायला अशी टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.

First Published on: October 1, 2023 10:34 PM
Exit mobile version