घरमुंबई...आणि मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकारी, कंत्राटदाराला झापले; एसआरए वसाहतीला अचानक भेट

…आणि मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकारी, कंत्राटदाराला झापले; एसआरए वसाहतीला अचानक भेट

Subscribe

दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांची, झोपडपट्टी तेथील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा पालिका आयुक्त इकबाल चहल यांना दिले.

मुंबई : मुंबईला स्वच्छ व सुंदर ठेवा. दररोज मुंबईतील रस्ते, शौचालये, झोपडपट्ट्यांमधील गल्ली, चौक नियमितपणे स्वच्छ करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच पालिकेला दिलेले आहेत. असे असतानाही रविवारी (1 ऑक्टोबर) कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीमध्ये भेट दिल्यानंतर तेथील शौचालय परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आढळून आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिकेच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना चांगलेच फैलावर घेऊन झापले.(…and the Chief Minister slapped the municipal officer the contractor A surprise visit to the SRA colony)

दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांची, झोपडपट्टी तेथील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा पालिका आयुक्त इकबाल चहल यांना दिले.

- Advertisement -

हेही वाचा : दहिसर येथे वर्धमान इंडस्ट्रियलमधील गाळ्यांना आग; सुदैवाने जीवितहानी टळली

अस्वच्छता व दुर्गंधी आढळून आल्याने संतापले

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ आज गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अचानक कुर्ला नेहरू नगर परिसरातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली आणि तेथील शौचालय आणि परिसराच्या साफसफाईची पाहणी केली. त्यावेळी तेथे अस्वच्छता व दुर्गंधी आढळून आल्याने मुख्यमंत्री शिंदे हे संतापले. त्यांनी संबंधित पालिका अधिकारी, कंत्राटदार यांना चांगलेच फैलावर घेऊन झापले.

- Advertisement -

हेही वाचा : मराठीचा मद्दा पुन्हा एकदा पेटला; मुलुंडनंतर आता कांदिवलीत जागा हडपण्याचा प्रयत्न

कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश

यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. स्थानिकांना तातडीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दररोज पाच वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी, पालिकेच्या खर्चाने त्याची दुरुस्ती, डागडुजी करावी आणि तसे न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावावी, कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे स्पष्ट आदेशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्त चहल यांना दिले.

एका महिन्याची दिली वेळ

आपला परिसर स्वच्छ असेल तर लोकांमध्ये रोगराई पसरणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सुंदर आणि निरोगी भारताचे उद्दिष्ट्य आहे ते साध्य होऊ शकेल. मुंबई महापालिका आयुक्तांना एका महिन्याचा वेळ देत या परिसरातील स्वच्छता, डागडुजी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -