घरमुंबईदहिसर येथे वर्धमान इंडस्ट्रियलमधील गाळ्यांना आग; सुदैवाने जीवितहानी टळली

दहिसर येथे वर्धमान इंडस्ट्रियलमधील गाळ्यांना आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Subscribe

या आगीत इंडस्ट्रियलमधील तीन ते चार गाळे जळाले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.

मुंबई : दहिसर (पूर्व) येथे वर्धमान इंडस्ट्रियलमध्ये शनिवारी (30 सप्टेंबर) रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत इंडस्ट्रियलमधील 3 ते 4 गाळे जळाले. सुदैवाने या आगीमुळे कोणी जखमी झाले नाही.(Coal fire at Vardhaman Industrial in Dahisar Fortunately, casualties were avoided)

प्राप्त माहितीनुसार, दहिसर ( पूर्व), एस व्ही रोड येथील तळमजला अधिक एकमजली वर्धमान इंडस्ट्रियलमध्ये शनिवारी रात्री 10.50 वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या आगीत इंडस्ट्रियलमधील तीन ते चार गाळे जळाले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. मात्र रात्री 11.10 वाजेपर्यंत आग तीन ते चार गाळयात पसरल्याने आणि आगीची भीषणता वाढल्याने अग्निशमन दलाने सदर आग स्तर- 2 ची असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

सात तासानंतर आगीवर नियंत्रण

यावेळी, अग्निशमन दलाच्या जवानांनी 7 फायर इंजिन, 6 जंबो वॉटर टँकर, एक वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर तब्बल सात तासांनी म्हणजे सकाळी 6.10 वाजता पूर्णपणे नियंत्रण मिळविले व आग विझविली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवीताना 8 – 9 गॅस सिलिंडर सुखरूपपणे वेळीच बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा आगीची भीषणता आणखीन वाढली असती.

हेही वाचा : मराठीचा मद्दा पुन्हा एकदा पेटला; मुलुंडनंतर आता कांदिवलीत जागा हडपण्याचा प्रयत्न

- Advertisement -

आगीचे कारण अस्पष्ट

ही आग का व कशी काय लागली, आगीचे कारण काय ? याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : ‘प्रभात’च्या स्वच्छता मोहिमेमुळे शिंदे कुटुंबात परतला ‘प्रकाश’

14 मजली इमारतीला लागली होती आग

दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील 14 मजली इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना 30 सप्टेंबर रोजी घडली. दुपारी अडीचच्या सुमार आग लागल्यानंतर अग्निशमन दलाकडून अवघ्या 15 मिनिटांत आग विझवण्यात आली. या आगीतून 27 जणांना वाचवण्यात यश आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमुळे दुर्घटनाग्रस्त इमारत आणि आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. गिरगावमधील सिक्का नगर परिसरातील डॉ. देशमुख लेनमधील चौदा मजली गणेश कृपा इमारतीला दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी आग लागल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण होते. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डकमध्ये लागलेली आग क्षणातच पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टपर्यंत पसरली. अग्निशमन दलाला या आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच रहिवासी दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर पडले होते, पण या इमारतीत अजूनही 27 जण रहिवासी अडकले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -