Weather In Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Weather In Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Weather In Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

राज्यात काही दिवसांपूर्वीच पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता, अशातच आता सर्वत्र अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाचे क्षेत्र आणि संबंधित सिस्टिम मधून कोकण किनारपट्टीमध्ये द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी कोकण किनारपट्टी आणि आतल्या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. कमी दाबाचे क्षेत्र ४८ तासात किनारपट्टी पासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यांवरही अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.

अशातच हवामान विभागाने राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यात मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणीमेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यामुळे पिक उत्पादकांना याचा फटका बसला असून, ऐन भात कापणीच्या काळात अवकाळी पावसाची धुवाधार एंट्री झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


हे ही वाचा – जितेंद्र आव्हाड यांची गुजरात सरकारवर टीका


 

First Published on: November 17, 2021 7:58 PM
Exit mobile version