जितेंद्र आव्हाड यांची गुजरात सरकारवर टीका

photo of jitendra avhad

मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद महापालिकेने शहरातील रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थ विकण्यास बंदी घातली आहे. या मुद्यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लोकांनी काय खावे हे सुध्दा आता शासन ठरवणार काय? असा जाब त्यांनी गुजरात सरकारला विचारला आहे.

अहमदाबादमध्ये रस्त्यावर मासांहारी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावरून जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट करीत भाजपवर निशाणा साधला आहे.

८० टक्के मासांहारी असलेल्या या देशात बीफबंदी हा ट्रेलर होता. पुढे काय घडणार याचा इशारा देणारा चित्रपट गुजरातमध्ये सुरु झाला आहे. तुम्ही काय खावे हे सुध्दा आता शासन ठरवणार, असे ट्विटमध्ये नमूद केले आहे.


हेही वाचा: Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी रोषणाई, सुशोभीकरण