साईनगर शिर्डी ते विजयवाडा दरम्यान ७ एप्रिलपासून साप्ताहिक विशेष

साईनगर शिर्डी ते विजयवाडा दरम्यान  ७ एप्रिलपासून साप्ताहिक विशेष

साईनगर शिर्डी ते विजयवाडा दरम्यान ७ एप्रिलपासून साप्ताहिक विशेष

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे साईनगर शिर्डी ते विजयवाडा दरम्यान साप्ताहिक विशेष गाड़ी चालविण्यात येणार आहे. 07208 विशेष गाडी दिनांक ७ एप्रिल २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत साईनगर शिर्डी येथून दर बुधवारी १७.२० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १५.१५ वाजता विजयावाडा येथे पोहोचेल. 07207 विशेष दिनांक ६ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवारी विजयवाडा येथून १०.१५ वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डीला दुसर्‍या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल.

या साप्ताहिक विशेष गाडीचे थांबे मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर (फक्त 07208 साठी), औरंगाबाद, जालना, परतूर (फक्त 07208 साठी), सेलू (फक्त 07208 साठी), मानवत रोड (केवळ 07208 साठी), परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर , भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, शंकरपल्ली, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, काझीपेट, वरंगल, महबूबाबाद, दोर्नाकल, खम्माम आणि मधिरा असे असणार आहेत. एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, दोन वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ९ शयनयान, ५ द्वितीय श्रेणी आसन अशी या गाडीची संरचना असणार आहे.

पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी क्र. 07208 साठी आरक्षण विशेष शुल्कसह ६ मार्च २०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेत स्थळावर सुरू होणार आहे. त्याचबरोबर उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकता किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करु शकता. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे. प्रवाशांना या विशेष गाडीतून प्रवास करताना प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


हेही वाचा – वाहतुकीसाठी ७ आणि २१ मार्चला मुंब्रा बायपास बंद; ‘या’ मार्गाने करा प्रवास

First Published on: March 4, 2021 9:09 PM
Exit mobile version