‘या’ कारणांमुळे ५३ टक्के पुरुष तर, ४२ टक्के महिला अविवाहित

‘या’ कारणांमुळे ५३ टक्के पुरुष तर, ४२ टक्के महिला अविवाहित

economic survey

अर्थसंकल्प सादर करण्याआधी २०१८च्या आर्थिक सर्वेक्षणाचा विधानसभेत अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालात अविवाहीत लोकांच्या बाबतीत धक्कादायक बाब समोर आली आहे. अर्थिक अहवालात अविवाहीत राहण्यामागचे मुख्य कारण शोधले गेले आहे. या अहवालात राज्यातील अविवाहित पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्यातील अविवाहित पुरुषांचे आणि महिलांचे प्रमाण कमी आहे .राज्यातील एकूण ५३.५ टक्के पुरुष तर, ४२.५ टक्के महिला अविवाहित असल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. बेरोजगारी, स्थलांतर, या मागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हेतर प्रदीर्घकाळ चालणारे शिक्षण, कंत्राटी नोकऱ्या यांचाही यात मोठा समावेश आहे.

राज्यात होण्याऱ्या स्थलंतरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागातून शहरात राहायला जाणाऱ्या लोकांची संख्या वर गेली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या लोकांची वाढ झाली आहे. त्यामुळे अविवाहिता हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. काही ठिकाणी आईवडीलांचा तर, काही ठिकाणी मुलांचा विरोध होताना दिसत आहे. माहितीनुसार, अर्थिक अडचण किंवा अपूर्ण शिक्षणदेखील अविवाहितेला जबाबदार आहेत. तसेच शिक्षण, कृषी संस्कृतीपासून दूर जाणे, नोकरीची जीवघेणी स्पर्धा या सगळ्यामुळे तरुण पिढीचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जात आहे, असे मत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथील प्राध्यापक डॉ. विभूती पटेल यांनी व्यक्त केले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाईमध्ये उशिरा लग्न करण्याचे प्रमाण वाढते आहे. तसेच बेरोजगारी आणि कंत्राटी नोकऱ्यांमुळेही अनेक तरुणांचे आज लग्न होत नाहीत.

शहरातील तरुण मुलांना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहायला आवडत असल्यामुळे अविवाहित लोकांच्या संख्येत भर पडली आहे. सीएसडीएसने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातही शहरी भागातील तरुण पिढी लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशीपलाच जास्त प्राधान्य देत असल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय घटस्फोटीत, विधवा, विभक्त यांच्या प्रमाणातही राज्यात किंचित वाढ झाली आहे

First Published on: June 24, 2019 1:40 PM
Exit mobile version