एक दिवस सर्व आमदारांचा संयम सुटेल तेव्हा… उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केसरकरांची संतप्त प्रतिक्रिया

एक दिवस सर्व आमदारांचा संयम सुटेल तेव्हा… उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केसरकरांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई शहरात महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी येथे सांगितले.

बुलढाण्यामध्ये आज उद्धव ठाकरे हे शेतकरी मेळाव्यात बोलत होते त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण शिंदे गटाचा सडकून टीका करत चांगलाच समाचार घेतला. बुलढाणा येथील चिखली येथे उद्धव ठाकरे बोलत असतानाच गुवाहाटीतून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी दीपक केसरकर म्हणाले, खोके खोके म्ह्णून तुम्ही कोणाला चिडवता असे म्हणत दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे. ज्यांनी स्वतःचे जीवन वेचले, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्यांची बदनामी केली जात आहे.एक दिवस या सर्व आमदारांचा संयम सुटेल तेव्हा कळेल की खोके कोणाकडे गेले. आणि खोके भरून पैसे कोणाकडे गेले ते सुद्धा एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेला कळेल आणि फ्रीजचा बॉक्स भरून कोणाकडे काय गेले हे देखील सांगू, असेही दीपक केसरकर म्हणाले.

तुमची माणसं सगळ्यांची बदनामी करत महाराष्ट्रभर फिरत आहेत, बदनामी सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा असते. पण जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाईल तेव्हा आम्ही सुद्धा बोलायला लागू, तुमचा आदर करतो म्हणून आम्ही काही बोलत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा असे दीपक केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरे त्यांच्या उलढाण्यातील भाषणावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. कामाख्या देवीचे कुंकू सुद्धा कपाळावर लावून बोलेन ते सत्य बोलेन. तुम्हाला भेटायला २०- २५ आमदार आले होते की नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत नको जाऊया आमदारांनी असे सांगून सुद्धा तुम्ही त्यांचे ऐकले नाही, तुम्ही खोटं बोलत राहिलात आणि तुमच्या सोबत खोटं बोलणारी लोकं तयार केलीत. असे शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले.


हे ही वाचा – देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, उद्धव ठाकरेंचा घणाघात

First Published on: November 26, 2022 7:01 PM
Exit mobile version