सचिन वाझेचा म्होरक्या कोण?; जयंत पाटलांचा सवाल

सचिन वाझेचा म्होरक्या कोण?; जयंत पाटलांचा सवाल

जयंत पाटील यांच्यावर अँजिओग्राफी शस्त्रक्रिया होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

सचिन वाझेच्या लेटर बॉम्बवर प्रतिक्रिया देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सचिन वाझेचा म्होरक्या कोण? असा सवाल केला आहे. सरकार कधी जाईल याची वाट पाहणार्‍या शक्ती या सगळ्या मागे आहेत का? भाजपचे नेते दोन दिवस थांबा अजून १-२ जणांची विकेट जाईल असे दावे करत आहेत. त्यानंतर NIA मध्ये गेलेलं पत्र प्रसार माध्यमांच्या हाती लागणं त्यात आणखी एक दोन नावं येणं. यावरुन एक स्पष्ट होतंय की भाजपचे नेते बोलतात त्यानंतर तसंच बाहेर येतं याचा अर्थ तपास सुरु आहे की राजकारण सुरु आहे अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

प्रश्न अनिल परब यांचा आहे त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. स्फोटके भरलेले गाडी ठेवली हे सगळं बाजूला राहिलं आणि ज्याच्यावर आरोप आहे तो काय बोलतो तेच बाहेर येतंय. ज्याच्यावर खूनाचा आरोप आहे, अशा व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. तपास स्फोटकांचा, तपास खूनाचा पण चर्चा वेगळीच होते. वाझेच्या बरोबर कोण आहे, म्होरक्या कोण आहे त्याला का अटक का होत नाही? असा सवा देखील जयंत पाटील यांनी केली.

भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर ती सात दिवसात करायची असते इथे तर किती तरी महिने झाल्यावर असे आरोप केले जात आहेत. इथे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नको त्या चर्चा केल्या जात आहेत. जीएसटी परतावा कमी दिला बोलायच नाही का? केंद्राने अत्याचार केले तर बोलायचं नाही का?

अनिल देशमुख लवकरच मंत्रीमंळात दिसतील

अनिल देशमुखांची प्राथमिक चौकशी झाल्यावर त्यांच्यावर ठपका असणार नाही. त्यानंतर अनिल देशमुख लवकर मंत्रिमंडळात दिसतील. सीबीआय चौकशीनंतर आमचा पक्ष त्यांचा विचार नक्की करेल. विदर्भातील ते आमचे प्रमुख नेते आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

 

 

First Published on: April 8, 2021 6:04 PM
Exit mobile version