मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

नाहीतर तोच कांदा तुमच्या तोंडावर हाणून मारु, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना दिला आहे.

ध्वजारोहण सोहळा सुरू असताना एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली. वंदना सुनील पाटील असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एका महिलेने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. (woman attempted to torch herself during flag hoisting by gulabrao patil in Jalgaon)

वंदना सुनील पाटील यांच्या आत्मदहनाची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत प्रसंगावधान दाखव मोठी दुर्घटना टाळली. या घटनेनंतर संबंधित महिलेला पोलिसांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणले. या पोलिस ठाण्यात त्यांची समजूत काढण्यात आली. तसेच, काली तासांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आजोयन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून,

वंदना सुनील पाटील या जामनेर येथील रहिवाशी असून, तेथील एका व्यापाऱ्याने वंदना पाटील यांच्या शेतमालाची परस्पर विक्री करत त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी संबंधित फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समजते.

“संबंधित महिलेची समस्येबाबत आपल्याला पूर्ण माहिती असून त्यांनी आरोप केलेल्या व्यापाऱ्याची यापूर्वीच चौकशी झाली आहे. संबंधित महिलेला प्रशासनाकडून काही मदत करता येईल का? याबाबत विचार केला जाईल”, अशी माहिती या सर्व प्रकारानंतर गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.


हेही वाचा – बिल्किस बानो बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगणारे 11 आरोपी मुक्त

First Published on: August 16, 2022 11:07 AM
Exit mobile version